नाकानं कांदे सोलणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यात गडगंज संपत्ती

DONALD TRUMP IN INDIA: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली आदी शहरांमध्ये ट्रम्प टॉवरसह प्रकल्पातून तब्बल १७५ कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. जाणून घ्या त्यांची भारतातील एकूण संपत्ती.
Trump Tower in Pune Mumbai
Trump Tower in Pune Mumbai Saam TV News Marathi
Published On
Summary
  • ट्रम्प टॉवर पुणे प्रकल्पाची सविस्तर माहिती

  • ट्रम्प यांची भारतातील रिअल इस्टेट गुंतवणूक

  • डोनाल्ड ट्रम्प भारतात किती कमवतायत

  • ट्रम्प टॉवरची विक्री किंमत आणि ब्रँड व्हॅल्यू

  • ट्रम्प भारतात कोणत्या शहरात प्रकल्प राबवत आहेत

Trump Tower in Pune Mumbai : भारतासोबतचा टॅरिफ वॉर, भारतीय अर्थव्यवस्था मृत म्हणणारे, भारताला सतत धमक्या देणारे आणि मीच कसा जगाचा उद्धार करणारा आहे असा अविर्भाव किमान चेहऱ्यावर दाखवत नाकाने कांदे सोलणारे डोनाल्ड ट्रम्प भारतात पसरलेल्या उद्योगातून कोट्यवधींची कमाई करत असल्याचं एका आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची पुणे, मुंबई, कोलकाता गुरूग्राम या ठिकाणी संपत्ती आणि गुंतवणूक असल्याचे इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्ताममध्ये सांगितलेय. गेल्या वर्षापर्यंत ट्रम्प यांनी सात प्रकल्पांमधून १७५ पेक्षा कोटी रुपये कमावले आहेत.

नोव्हेंबर २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतामध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली. भारतामधील भागिदारी ट्रायबेका डेव्हलपर्ससह गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये किमान सहा प्रकल्पांची घोषणा केली. तब्बल ८० लाख चौरस फुटांचा रिअल इस्टेट विकास होणार आहे. या प्रकल्पांमधून ट्रम्प ऑर्गनायझेशनची कमाई अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते, सर्वात मोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी भागीदारीमुळे ट्रम्प यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांची पुणे, मुंबईमध्ये कुठे आणि किती संपत्ती आहे, याबाबत जाणून घेऊयात...

Trump Tower in Pune Mumbai
Gadchiroli accident: मार्निंग वॉकसाठी गेले अन् काळाने गाठलं! ६ मित्रांना भरधाव वाहनाने चिरडले, भयंकर अपघात

ट्रम्प टॉवर, पुणे

२३ मजली २ टॉवर कल्याणी नगरमध्ये, पंचशील रिअल्टी येथे आहेत. २०१२ मध्ये याचे बांधकाम सुरू झाले होते, २०१५ मध्ये हे तयार झाले. या प्रकल्पाचा खर्च अदाजे ३०० कोटी रूपये इतका आहे.

ट्रम्प टॉवर, मुंबई

वरळीमध्ये, लोढा ग्रुपने २०१३ मध्ये जाहीर केले. यामध्ये ट्रम्प यांचाही हिस्सा आहे.  ७६ मजली टॉवरचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले. ट्रम्प यांचा प्रकल्प खर्च ३,००० कोटी रूपये इतका आहे.

ट्रम्प टॉवर, कोलकाता

३८ मजली निवासी टॉवर, ईएम बायपासवर, त्रिबेका, उनिमार्क आणि आरडीबी ग्रुपने २०१७ मध्ये सुरू केले. जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प खर्च सुमारे रु. ४०० कोटी (अंदाजे) आहे.

ट्रम्प टॉवर्स दिल्ली

एनसीआर, गुरुग्राम २०१८ मध्ये त्रिबेका आणि एम३एम ग्रुपने सेक्टर ६५ मध्ये दोन ४७ मजली टॉवर सुरू केले. २०२६ च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प खर्च रु. १,९०० कोटी रूपये इतका आहे.

Trump Tower in Pune Mumbai
Nagpur Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले, ९ स्थानकावर थांबणार, कोणकोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदा भारतात पाऊल टाकले. पुण्यामध्ये सर्वात आधी टॉवर उभारला, त्यानंतर मुंबई, दिल्ली अन् कोलकाता या देशातील प्रमुख शहरात आपला व्यावसाय विस्तारला. नवीन उपक्रमांमुळे अंदाजे किमान 15,000 कोटी रुपयांचा विक्री क्षमता आहे, असे ट्रायबेका डेव्हलपर्सने यावर्षी मार्चमध्ये पुण्यातील पहिल्या व्यावसायिक प्रकल्पाच्या लॉन्चवेळी सांगितले.

ट्रम्प ऑर्गनायझेशन थेट बांधकामात कोणताही गुंतवणूक करत नाही. त्यांचं ब्रँड लायसन्स फी किंवा डेव्हलपमेंट फीसाठी देतात. अथवा प्रकल्पाच्या विक्रीत ५ ते ७ टक्क्यांचा वाटा असतो. या मालमत्ता सामान्यतः लक्झरी प्रकल्प म्हणून विकल्या जातात. त्यात राष्ट्राध्यक्षांचे नाव जोडल्याने प्रीमियम मिळतोच. भारतात हे प्रकल्प राबवणाऱ्यांमध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि लोढा ग्रुप, M3M ग्रुप, पंचशील रिअल्टी, IRA इन्फ्रा आणि युनिमार्क सारख्या स्थापित रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश आहे. कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील ट्रायबेका डेव्हलपर्स हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे भारतातील अधिकृत भागीदार आहेत.

Trump Tower in Pune Mumbai
PUNE VIOLENCE: पुण्यात खळबळ, कोयत्याने २ जणांवर हल्ला, काँग्रेसच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com