Dombivali News : डोंबिवली हादरली; मुख्याध्यापकाचे ७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; ६ वर्षांपूर्वीही केलं होतं असंच कृत्य, पण...

Dombivli Teacher Arrested: डोंबिवलीत निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने ७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे.
Dombivli school protest over alleged teacher abuse
Dombivli school protest over alleged teacher abuseSaam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही

डोंबिवली येथून शिक्षक पेशाला काळिमा फसणारी घटना घटना घडली आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेचे पालक आणि ग्रामस्थांनी हा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनं प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, संशयित आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Dombivli school protest over alleged teacher abuse
Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

डोंबिवलीजवळील निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेत एका ७ वर्षीय चिमुरडीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पालक व ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकार शाळेतील मधल्या सुट्टीच्या वेळी घडल्याचे सांगितले जात आहे. पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी इतर शिक्षकांना व स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.

Dombivli school protest over alleged teacher abuse
Shocking : मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून संतापली, लोखंडी चमच्याने चिमुकल्याला दिले चटके; आईला अटक

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती. निळजे गावातील ग्रामस्थांनी या घटनेचा गंभीर निषेध करत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्वरित कारवाई करत प्रभारी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी दोषींवर कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Dombivli school protest over alleged teacher abuse
Crime : भिंतीवर डोकं आपटून २ वर्षांच्या मुलाला संपवलं, नंतर नराधम बापानं स्वत:वर चालवली कुऱ्हाड

या मुख्याध्यापकाने 2019 साली देखील असेच कृत्य केले होते. त्यावेळी आम्ही शिक्षणाधिकारी यांना त्याची तक्रार केली होती. मात्र त्यावेळी कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणजे शिक्षणाधिकारी याला पाठीशी घालत आहे का अशी शंका तेथील ठाकरे गटाचे नेते मुकेश भोईर यांनी व्यक्त केले आहे. तसेच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मानपाडा पोलीस स्थानक पुढील तपास करत असून आरोपी शिक्षकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती ACP सुहास हेमाडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com