Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...

जमिनीच्या वादातून कल्याण ग्रामीण मधील मोकाशी पाडा गावात पाच दिवसांपूर्वी रक्तरंजीत राडा झाला होता.
Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...
Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...SaamTvNews
Published On

डोंबिवली : जमिनीच्या वादातून कल्याण ग्रामीण मधील मोकाशी पाडा गावात पाच दिवसांपूर्वी रक्तरंजीत राडा झाला होता. या नंतर जखमी शेतकरी कुटुंबाने पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याचे आरोप केले होते. यानंतर पाच दिवसांनी पोलिसांनी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांसह अन्य सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, असं असताना आता म्हात्रे यांच्या सोबत असलेल्या चोचे याने तक्रार केल्यानंतर काही वेळातच शेतकरी कुटुंबावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हे देखील पहा :

कल्याण (Kalyan) ग्रामीण भागातील मोकाशी पाडा गावात गुरुवारी रात्री जमिनीचा वाद हा उफाळून आला होता. यामध्ये सर्वाधिक जखमी हे मोकाशी कुटुंबातील शेतकरी झाले होते. मारहाण अधिक प्रमाणात झाली असल्याने शेतकरी कुटुंबाने शिळं डायघर पोलीस ठाणे गाठले होते. पोलिसांनी देखील तातडीने शेतकरी कुटुंबाला वैद्यकीय उपचाराची गरज असल्याने मेडिकल मेमो दिला होता. मात्र, वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर शेतकरी कुटुंब हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांची गुन्हे दाखल करण्यास नकार दिला होता. यानंतर शेतकरी कुटुंबाने मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार प्रमोद (राजू )पाटील यांच्याशी संपर्क साधत आपली कैफियत त्यांच्यासमोर मंडळी होती.

Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...
Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी!

यानंतर तातडीने आमदार पाटील यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे हे उपस्थित नसल्याने मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) हे सहा तास पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसले होते. अखेर मंगळवारी शिळ डायघर पोलिसांनी शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे, सचिन रघुनाथ पाटील, वैभव हरिश्चंद्र पाटील, यांसह पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...
कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!

मात्र, त्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) म्हात्रे यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने तक्रार दाखल करताच तातडीने शीळ डायघर पोलिसांनी शेतकरी (Farmers) कुटुंबातील देविदास मोकाशी,प्रशांत मोकाशी,एकनाथ मोकाशी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी शेतकरी कुटुंबावर झालेला अन्याय आणि शेतकऱ्यांची मागणी थांबवून तब्बल पाच दिवसांनी गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे.

Dombivli : त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल...
Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

तर शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीं नंतर काही क्षणातच गुन्हे दाखल करण्यात शेतकऱ्यांवर आले आहेत. त्यामुळे पोलिसांवर कुणाचा राजकीय दबाव होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांनी माजी नगरसेवक याचा उल्लेख एफआयार कॉपी मध्ये नगरसेवक केल्याने अनेकांच्या उभव्या उंचलवल्या आहेत. महापालिका निवडणुकी आधीच माजी नगरसेवकला , नगरसेवक पोलिसांनी घोषित केले याची चर्चा रंगू लागली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com