कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!

दोन महिलांना बेदम मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि पैसे घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे.
कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!
कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!SaamTvNews
Published On

कल्याण : कल्याण (Kalyan) पश्चिमेतील आटाळी मानी गावात दोन महिलांना बेदम मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि पैसे घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जखमी दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास सुरू केला आहे.

हे देखील पहा :

कल्याण (Kalyan) नजीक आटाळी मानी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. आटाळी मानी या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्यांनी माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. गणेश विसजर्नानांतर आई, मुलगी आणि दोन मुलांसह आपल्या घरी झोपल्या होत्या.

कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!
Kirit Somaiya : केंद्रीय सुरक्षेमुळे सोमय्या वाचले नाहीतर श्रद्धांजली वाहावी लागली असती

दरम्यान, मध्यरात्री आईला आवाजामुळे जाग आली तेव्हा तिला दिसले की दोन चोरटे (Thieves) घरात शिरले आहेत आणि तिने आरडाओरड सुरु करण्याआधीच तिच्या डोक्यावर त्या चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली आणि सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

कल्याण : महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने आणि रोकड लंपास!
Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी!

मात्र, चोरट्यांनी तिलाही मारहाण केली आणि घरातील 13 तोळे दागिने, काही रोकड घेऊन पसार झाले. दरम्यान, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलिस स्थानकात खडकपाडा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून तपास चालू केला आहे. मात्र घरात घुसून दोन महिलांन मारहाण करुन लुटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस या चोरट्यांना ऐवजासह पकडतात हे पहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com