Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

प्रथा परंपरांना छेद देऊन पुण्यातील प्रीती आगळे या उच्चशिक्षित विधवा महिलेने 'हळदी कुंकू' कार्यक्रम आयोजित केला. प्रीती स्वतः एमटेक शिकलेली असून एका उद्योगसमूहात सध्या काम करते.
Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन SaamTvnews
Published On

पुणे : हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सवाष्ण महिला इतर सवाष्ण महिलांसाठी करतात या परंपरेला छेद देत अलीकडच्या काळात विधवा (Widow) महिलांना यात सहभागी करुन घेतलं जातंय, याही पलीकडे जात पुण्यातील प्रीती आगळे या विधवा महिलेने उलटा प्रयोग केला. विधवा महिलांना निमंत्रित करणे सोपे आहे. पण विधवा महिलेकडून इतर सौभाग्यवती महिला हळदी कुंकू घेतात का? असा विचार करुन प्रीतीने हळदी कुंकू आयोजित केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

हे देखील पहा :

संक्रातीनंतर अनेक घरात बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात, यात प्रामुख्याने सवाष्ण बायका म्हणजे ज्यांचा नवरा ह्यात आहेत अशा बायका एकमेकींना हळद कुंकू लावून भेटवस्तू देतात. अशी साधारण परंपरा दिसून येते, मात्र असा पारंपरिक विचार न करता पुण्यातील प्रीती या विधवा महिलेने हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित केला. विधवांना समाजात धार्मिक परंपरेत जी अपमानास्पद वागणूक मिळते. ती दूर करण्यासाठी प्रीतीचा प्रयत्न आहे, प्रबोधनाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी!

प्रीती स्वतः एमटेक शिकलेली असून एका उद्योगसमूहात सध्या काम करते. गेल्या वर्षी कोरोनामुळे (corona) तिच्या पतीचं (Husband's Death) निधन झालं, खरंतर कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार तुटलेत. अनेकांच्या वाट्याला एकाकी जगणं आलंय. मात्र, सगळे विचार बाजुला करून, क्षणाचाही वेळ न दवडता, प्रीती आपल्या लहान मुलाकडे बघून खंबीर झाली, या काळात अनेक बरे वाईट अनुभव आले. त्यामध्ये विधवा स्त्री च्या वाट्याला जे वाईट अनुभव येताय ते थांबण्यासाठी प्रितीने पुढाकार घेतलाय.

Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
Bhandara : कोरोनात पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी 'तिचा' संघर्ष!
Pune : विधवा महिलेकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
Kirit Somaiya : केंद्रीय सुरक्षेमुळे सोमय्या वाचले नाहीतर श्रद्धांजली वाहावी लागली असती

या सांस्कृतिक बंधनांना आपणच दूर केले पाहिजे या हेतुने प्रितीने हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले. विधवांना इतर महिलांसारखे सन्मानाने जगता यायला हवे, यासाठी प्रीतीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. हळदी कुंकू आणि वाण हा एका सूहासिनीने दुसऱ्या सूहासिनीला दिलेला मान, ह्या पूढे जाऊन ही चौकट वाढवून एका स्त्री ने दूसऱ्या स्त्री ला दिलेला मान या भावनेने पहायला हवा हेच प्रितीने या कृतीतून दाखवून दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com