अभिजीत देशमुख, कल्याण
डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. इंजिनिअर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. तरुणाने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी फेरीवाल्यांना पोलीस शोध घेत आहेत. (Latest Marathi News)
डोंबिवली पूर्व श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. काही दिवसांपूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकिज परिसरात गेला होता. त्या ठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारल्याने फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सुधीरने फेरीवाल्यांवर आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे.
इंजिनिअर तरुणाने याआधी देखील अनेक फेरीवाल्यांची तक्रार केली आहे. याच रागातून फेरीवाल्यांनी मारहाण झाल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच मी इतका टॅक्स भरतो. माझ्या शहरात माझ्यासाठी फुटपाथ चालायला मिळत नाही. जो फुटपाथ आहे, त्यावर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय? महापालिका काय करते, असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, कल्याण महापालिकेचे आयुक्त इंदूराणी जाखड यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वॉकेबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल.ते आम्ही करणार असा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याची पोलखोल झाली आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन,राजकीय पक्ष हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांच्या मुजोरीला कोण आळा घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.