Dombivli Crime: खळबळजनक! घरी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला निर्जनस्थळी नेले; अतिप्रसंगाचा प्रयत्न... दोन नराधमांना अटक

Dombivli Crime News: धाडसी कामगिरी करणारे पोलीस सुधीर हसे आणि अतुल भोई यांचे मानपाडा पोलिसांकडून कौतूक करण्यात आले आहे.
Dombivli Crime
Dombivli CrimeSaamtv
Published On

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Dombivli Crime News: देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली भागात घडला. सुदैवाने गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधान व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला असून दोन्ही नराधम गजाआड करण्यात यश आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dombivli Crime
Maratha Andolan: आम्ही मनोज जरांगे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत; अर्जुन खोतकरांनी मांडली सरकारची भूमिका

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी की एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला हाेता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. महिलेला संशय आल्याने तिने आरडा ओरडा केला.

मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने शस्त्राचा धाक दाखवत महिलेला निर्जनस्थली नेले. याच दरम्यान गस्तीवर असणारे मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांना याचा संशय आला. दोघांनी या रिक्षाचा पाठलाग करत नराधमांना पकडले. यावेळी आरोपीने एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले.

Dombivli Crime
Maratha Reservation : मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, ओबीसीतून देणार असाल तर रस्त्यावर उतरू: विजय वडेट्टीवार

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोघाही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो. तर त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com