Dombivli Accident News: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने उचललं टोकाचं पाऊल; धावत्या ट्रेनखाली उडी घेत संपवलं जीवन

Dombivli Accident News: या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडालीये.
Dombivli Railway Station
Dombivli Railway Stationsaam tv
Published On: 

अभिजित देशमुख, कल्याण

Dombivli News: डोंबिवली रेल्वे स्थानकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केलीये. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडालीये. (Latest Dombivli News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकलखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. ही हृदयाद्रावक घटना डोंबिवली (Dombivli) रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास घडली. प्रभा नांबूदिरी असे मयत महिलेचे नाव आहे.

Dombivli Railway Station
Satara Crime News: साताऱ्यात ठेकेदारीवरून वाद पेटला; रिपाईंचे 2 गट एकमेकांना भिडले

डोंबिवली पश्चिमेकडील कर्वे रोड परिसरात ही महिला राहत होती. गेल्या अनेक वर्षापासून महिला दमा या आजाराने त्रस्त होती. आजाराला कंटाळून आपण आत्महत्या केल्याची सुसाईड नोट महिलेजवळ आढळून आल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

दमा हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीला प्रचंड खोकल्याचा आणि श्वास घेण्याचा त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रभा या फार त्रस्त झाल्या होत्या. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खूप औषधोपचार घेतले. वेगवेगळ्या दवाखाण्यात जाऊन उपचार घेतले. मात्र काही केल्या त्यांची प्रकृती सुधारत नव्हती.

Dombivli Railway Station
Nashik vani bus Accident: सप्तश्रृंगी गड बस अपघातांना मृतांना मदत जाहीर; पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी

आपल्या आजारपणामुळे त्या पुर्णता नैराश्यात गेल्या होत्या. अशात या नैराश्यातून स्वत:चे जीवन संपवण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. शेवटी उपचारासाठी गेले असताना महिलेने थेट रेल्वे रुळांवर उडी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.