Satara Crime News: साताऱ्यात ठेकेदारीवरून वाद पेटला; रिपाईंचे 2 गट एकमेकांना भिडले

रिपाईंचा आठवले गट आणि गवई गट एमेकांना भिडल्याने कार्यालयात भीतीचे एकच वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
Satara Crime News
Satara Crime NewsSaam tv

Satara News: साताऱ्यात पोवई नाका येथे असलेल्या कामगार आयुक्तालय कार्यालयात मंगळवारी दुपारी जोरदार राडा झाला आहे. रिपाईंचा आठवले गट आणि गवई गट एकमेकांना भिडल्याने कार्यालयात भीतीचे एकच वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

साताऱ्यातील कामगार आयुक्तालय कार्यालयात दोन गटात जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ठेकेदारीवरून रिपाईचे आठवले गट आणि गवई गटातील 25 ते 30 जणांचा जमाव समोरासमोर भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे.

Satara Crime News
Nandurbar Heavy Rain : अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात पावसाचा हाहाकार; पाच गावांचा संपर्क तुटला, गावात शिरले पाणी

पोलिसांनी या प्रकरणी ४ ते ५ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदारीच्या कारणातून दोन गटात धुसफूस सुरू होती. यातूनच दोन्ही गट सहाय्यक कामगार आयुक्तालय कार्यालयात एकमेकांसमोर आल्याने वाद निर्माण झाला होता.

यामध्ये दोन्ही गटामध्ये हाणामारीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे पंधरा मिनिटे ही वादावादी सुरू होती. उपस्थित गोपनीय पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेत घटनेचे चित्रीकरण करण्यातच धन्यता मानली आहे.

ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या नावानं शेतकऱ्यांची घोषणाबाजी

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील थकलेला पिक विमा द्या, ही मागणी घेऊन शेतकऱ्यांनी ट्रिपल इंजिन आंदोलन केलं आहे. याच आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री, राज्यामध्ये असलेले दोन उपमुख्यमंत्री यांच्या नावाने घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर आमचा विमा हा तात्काळ द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

Satara Crime News
Education Officer Suspended : परभणीचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलंबित

विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधी पक्षनेते असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपली भाषा बदलली, असं सुद्धा यावेळी या आंदोलकांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी सरकारच्या नावाने ट्रिपल इंजिन म्हणून घोषणा देण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com