डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ कायम, सूत्रांच्या माहितीनंतर प्रकरणात नवा ट्विस्ट, मृत्यूचं कारण कलिंगड की पेनकिलर?

Biryani & Watermelon Not The Cause: बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यानं डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूला कलिंगड आणि बिर्याणी कारणीभूत आहे का? डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू कसा झाला?
Investigation underway in Mumbai’s Dokadia family death case as forensic reports hint at possible drug involvement.
Investigation underway in Mumbai’s Dokadia family death case as forensic reports hint at possible drug involvement.saam tv
Published On

मुंबईतल्या पायधुनीत बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यानं डोकाडिया कुटुंबातील चार जणांनी आपला जीव गमावला... मात्र, आता डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. सुरूवातीला विषबाधेनं मृत्यू झाल्याचं बोललं जात असलं तरी सूत्रांच्या हवाल्यानंतर या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. सूत्रांच्या माहितीनंतर, डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पेनकिलर-सदृश औषधांत अंश आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

बिर्याणी किंवा कलिंगडात औषध आधीच मिसळलं होतं का? की औषधांचा ओव्हरडोस? याचा शोध सुरू आहे.

इतकंच नाहीतर शरीरातील विषारी घटक नेमके कुठले, हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे

खरंतर, डोकाडिया कुटुंबियांच्या शरीरात औषधांचं काही अंश आढळलेत का, यासंदर्भात फॉरेन्सिक अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यानंतरच डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत खुलासा होणार आहे. एव्हंढच नाहीतर यामागे विषबाधा की अन्य काही कारण आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com