डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

Doctor Seriously Injured in Knife Assault at KEM Hospital: मुंबईतील केईम रूग्णालयात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला. महिला कर्मचाऱ्याच्या भावानं संतापून हल्ला केला.
Doctor Seriously Injured in Knife Assault at KEM Hospital
Doctor Seriously Injured in Knife Assault at KEM HospitalSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टिव्ही

मुंबईतील KEM रूग्णालयातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रूग्णालयातील डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याच्या भावाने केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या परळ येथील केईएम रुग्णालयात एका डॉक्टरवर रुग्णालयातच चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याच्या भावाने केल्याची माहिती मिळत आहे.

Doctor Seriously Injured in Knife Assault at KEM Hospital
सोनं खरेदीदारांसाठी सुवर्णयोग; १० तोळं सोनं १९ हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही कमालीची घट

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर आणि ती महिला कर्मचाऱ्यांमध्ये काही वैयक्तिक संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याच गोष्टीचा राग आरोपी भावाला होता. याच संतापातून त्याने थेट रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या केईएम रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

Doctor Seriously Injured in Knife Assault at KEM Hospital
शरीरसंबंध ठेवण्यास बायकोचा नकार; नवऱ्यानं छतावरून फेकलं, नेमकं काय घडलं?

घटनेनंतर आरोपी आणि त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून भोईवाडा पोलिस ठाण्यात हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र तपासाचं जाळं उभं केलं असून या प्रकरणामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com