मावळ : मावळ मधील तळेगाव दाभाडे(Talegaon Dabhade) नगरपालिकेने मागील तीन महिन्यापासून दिव्यांगांचे अनुदान(Disability Grants) थांबवल्यामुळे या नागरिकांवरती उपासमारीची वेळ आली होती अनेक हेलपाटे शासकीय कार्यालयात मारूनही सरकारी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे या दिव्यांग नागरिकांनी तळेगाव नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केले. (Disability grants received)
हे देखील पहा-
कोरोनाकाळात(Corona Period) आम्ही जगायचं कसं हा प्रश्न दिव्यांगा पुढे आ वासून उभा असतानाच कोरोना काळात काहींचे रोजगारही गेले होते स्वयंरोजगारासाठी वाव नाही या तीन महिन्यांमध्ये अपंग व्यक्तींची कुचंबणा झाली. छोटे-मोठे व्यवसाय होते तेही बंद झाले यामुळेच या नागरिकांनी आंदोलन केले होते.
दरम्यान जनविकास सेवा समिती दिव्यागांच्या मदतीला धावून आली आहे. जनविकास सेवा समितीने पुढाकार घेऊन आम्हाला दोन महिन्याची अनुदान मिळवून दिल्याबद्दल समितीचे आभारही दिव्यांग व्यक्तींनी मानले आहेत. दरम्यान जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी यापुढे अनुदान थांबणार नाहीअशी ग्वाही या दिव्यांगाना दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.