Nagar Kalyan Highway News : धनगर आरक्षणासाठी नगर- कल्याण महामार्गावर रास्ता राेकाे

Dhanagar Reservation : या मोर्चात शेकडाे धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.
DHANGAR RESERVATION, Nagar Kalyan Highway News
DHANGAR RESERVATION, Nagar Kalyan Highway Newssaam tv
Published On

- सुशिल थाेरात

Nagar News : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज (शुक्रवार) नगर- कल्याण महामार्गावर धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिणामी नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (Maharashtra News)

DHANGAR RESERVATION, Nagar Kalyan Highway News
'सीएम महाराष्ट्रात कुठूनही निवडून येतील', आदित्य ठाकरेंच्या 'ओपन चॅलेंज' वर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांला विश्वास

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गेल्या 17 दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील सखल धनगर समाजाच्या वतीने हे आंदाेलन छेडण्यात आले.

DHANGAR RESERVATION, Nagar Kalyan Highway News
Ganesh Festival 2023 : गौरी गणपतीमुळे फुलांचा भाव वधारला, झेंडूसह शाेभिवंत फुले शंभरी पार

आंदाेलकांनी मेंढपाळांसह सुमारे एक तास नगर कल्याण महामार्गावरील ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी सरकारचा निषेध केला. सरकारने येत्या चार ते पाच दिवसात आरक्षणाविषयी जर तोडगा काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या रास्ता रोकोमुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना आंदाेलकांनी निवेदन दिले.

Edited By : Siddharth Latkar

DHANGAR RESERVATION, Nagar Kalyan Highway News
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ६ दिवसांची परवानगी, वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com