Devendra Fadnavis: PM मोदींसाठी महाराष्ट्रात नवा विक्रम करायचाय; देवेंद्र फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला नवा कानमंत्र

Devendra Fadnavis News In Marathi: शनिवारी भाजपने राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

सुरज मुसरकर, मुंबई

Devendra Fadnavis News:

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहे. भाजप नेत्यांनीही आगामी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज शनिवारी भाजपने राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक नवा विक्रम महाराष्ट्रात करायचा आहे. तुम्ही किती जागा मिळणार आहेत, याचा विचार न करता कामाला लागा, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करा. मोदी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचवा. त्यासाठी तळागळातील लोकांना भेटा. येणारी लोकसभा ही तीनही पक्षातील सहकाऱ्यांना एकत्र घेऊन लढायची आहे. मोदींसाठी एक नवा विक्रम या महाराष्ट्रात करायचा आहे. पक्षासाठी कामाला लागा. सर्वांना एकत्र घेऊन निवडणुकांना समोरे जायचं आहे'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis
Supriya Sule: मी दहा महिने घरी जाणार नाही; आगामी निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंची लढाऊ प्रतिज्ञा

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवताना सर्वाधिक रेट महाराष्ट्राचा असेल, हा आपला निर्धार कायम ठेवा. नवीन कार्यकर्ते जोडा. जातीय विषय कितीही असले तरी आपण जातविरहित समाज म्हणून एकत्र राहून देशाचा विचार करा'.

Devendra Fadnavis
Political Explainer: मनसेत लोकसभेसाठी रस्सीखेच, पुण्यातील मनसेचे ४ नेते निवडणुकीसाठी इच्छुक; कुणाची ताकद किती?

'संपर्क यंत्रणा अधिक बळकट करा. सोशल मीडियावर प्रतिसादाची गती वाढवा. सामान्य माणूस आणि गरीब यांच्याशीच कनेक्ट ठेवा. आपली व्होटबँक कुठल्याही सर्व्हेत न येणारी आहे, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com