Supriya Sule: मी दहा महिने घरी जाणार नाही; आगामी निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंची लढाऊ प्रतिज्ञा

Supriya Sule Latest Speech News : 'पहिली लोकसभा, दुसरी विधानसभा निवडणुकीचा गुलाल घेऊनच घरी यायचे. मी दहा महिने घरी जाणार नाही, असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Supriya Sule
Supriya Sulesaam tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

Supriya Sule Latest Speech:

राज्यातील सर्व राजकीय पक्षांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षबांधणी आणि रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा सुरु झाली आहे.

याचदरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे. या मोर्च्याच्या पदयात्रेत सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीसाठी लढाऊ प्रतिज्ञा घेतली आहे. 'पहिली लोकसभा, दुसरी विधानसभा निवडणुकीचा गुलाल घेऊनच घरी यायचे. मी दहा महिने घरी जाणार नाही, असा निश्चय खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

शेतकरी आक्रोश मोर्च्यातील सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'एक रुपया कडीपत्ता सरकार झाले आहे. आम्ही पाण्याच्या प्रश्नावर कधीही राजकारण केलेले नाही. करणारही नाही. पण सरकारने पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. मागील दहा वर्षात संसदेत आरक्षणावर सर्वात जास्त कोण बोलले असेल तर मी बोलले आहे. मराठा, लिंगायत, धनगर , मुस्लिम आरक्षणासाठी भांडत राहणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच आईची दोन मुले आहेत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supriya Sule
Narendra Modi: '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा'; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

अजित पवारांवर सुळेंना निशाणा

'पीडीसीसी बँक इथेच आहे. सध्या चालवणारे जरा भरकटले आहेत. सुप्रिया सुळेंची अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका आहे.

राज्य सरकारवर निशाणा

'अंगणवाडी सेविकांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. कर्नाटकच्या माणसाला आमचा एक कारखाना विकला. पण ते बिचारे निराणी चांगले आहेत. पैसे देत आहेत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर टीका केली.

दरम्यान, कुल यांनी भिमा पाटस सहकारी कारखाना कर्नाटकातील निराणी समुहाला चालवायला दिला आहे. यावरून सुळे यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Supriya Sule
Political Explainer: मनसेत लोकसभेसाठी रस्सीखेच, पुण्यातील मनसेचे ४ नेते निवडणुकीसाठी इच्छुक; कुणाची ताकद किती?

'माझे विरोधक म्हणतात, सुप्रिया सुळे यांची सर्वात मोठी ताकत त्यांची इमानदारी आहे. त्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीला घाबरत नाही. ते माझे काहीही करु शकत नाहीत, अशा शब्दात सुळे यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com