Political Explainer: मनसेत लोकसभेसाठी रस्सीखेच, पुण्यातील मनसेचे ४ नेते निवडणुकीसाठी इच्छुक; कुणाची ताकद किती?

Political Explainer: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन आहेत. त्यांच्याकडून सातत्याने पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. याच मतदारसंघासाठी मनसेचे चार नेते इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Political Explainer
Political ExplainerSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे

Pune MNS Upcoming Loksabha Election:

लोकसभा निवडणुकीचं बिगूल अद्याप वाजलेलं नाही. पण प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने काही महत्त्वाच्या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन आहेत. त्यांच्याकडून सातत्याने पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. याच मतदारसंघासाठी मनसेचे चार नेते इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही नेत्यांनी तिकीटासाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

राज ठाकरे सातत्याने पुण्याचा दौरा करत आहेत. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील सातत्याने पुण्याच्या दौऱ्यावर जात आहेत. मनसेनेही पुण्यात कामांचा धडाका सुरु आहे. ऐनवेळी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील चार नेत्यांनी खासदारकीच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.

यात पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, मनसे नेते साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, किशोर शिंदे यांचा समावेश आहे. वसंत मोरे यांनीही अनेकदा खासदारीची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे साईनाथ बाबर यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे मोरे यांनी थेट शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नाव घेत साकडं घातलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Political Explainer
Pune Supriya Sule News | जन आक्रोश मोर्चातून सुप्रिया सुळे यांनी सरकारला काय विनंती केली?

वसंत मोरे काय म्हणाले?

'राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडे देखील खासदार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी माझा मेसेज हा थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मला कुणाच्याही मार्फत मेसेज देण्याची गरज नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली.

'ठाकरे कुटुंब माझ्यासाठी देव आहेत. सर्वात आधी मी इच्छा व्यक्त केली होती. मी पुणे लोकसभा लढवली तर 100 टक्के जिंकून दाखवेन. मी बारामती लोकसभा लढवणार नाही. पक्षाने संधी दिली तर पुण्यातूनच लढणार. राज ठाकरे जे सांगतील तीच भूमिका वसंत मोरे आजपर्यंत घेत आलो आहे', असंही वसंत मोरे म्हणाले.

‘…तर खासदारकी देऊन टाकू’

वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांच्या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे. 'साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. साईनाथ बाबर यांनी गटनेते व्हायची इच्छा व्यक्त केली. मी गटनेते पद दिलं. शहराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली, मी शहराध्यक्ष पद दिलं, जर खासदार व्हायची इच्छा व्यक्त करत असतील तर खासदारकी देऊन टाकू. राज ठाकरेंनी सांगितलं तर शंभर टक्के साईनाथ बाबर यांना पाठिंबा देणार, असं वसंत मोरे म्हणाले.

'राज ठाकरेंचा आदेश हाच अंतिम निर्णय असेल. राज ठाकरेंनी सांगितलं तर साईनाथ बाबर यांचा मी स्वतः प्रचार करेन. पुण्यात मनसेसाठी चांगलं वातावरण आहे. शेवटी पुण्याचा खासदार कोण होईल हे पुणेकर ठरवतील. राज ठाकरे सांगतील तोच पुण्यात उमेदवार होईल. अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली.

साईनाथ बाबर काय म्हणाले?

दरम्यान, मनसे नेते साईनाथ बाबर यांनी देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मी लोकसभा लढवणार अशी भूमिका बाबर यांनी स्पष्ट केली आहे.

Political Explainer
Amol Kolhe Speech In Pune | कांद्याच्या निर्यातबंदीवरून अमोल कोल्हे यांचा सरकारवर हल्लाबोल

कुणाची किती ताकद?

साईनाथ बाबर यांची ताकद किती?

साईनाथ बाबर हे मनसेचे पुणे शहराध्यक्ष आहेत. बाबर यांची बायको 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या कालावधीत पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होती. तसेच त्यांनीही 2017 ते 2022 या ५ वर्षांच्या कालावधीत साईनाथ बाबर यांनीही नगरसेवक पद भूषवल आहे. पुण्यातील मुस्लिम बहुल असणाऱ्या कोंढवा भागातून मनसे नेते साईनाथ बाबर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण लोकसभेचा विचार करता मनसे नेते साईनाथ बाबर यांचा कोंढवा हा प्रभाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो.

Political Explainer
MNS News: लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मास्टर प्लान; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

वसंत मोरे यांची ताकद किती?

वसंत मोरे हे मनसेचे पुणे माजी शहराध्यक्ष आहेत. त्यांना पुण्यातील आणि राज्यातील मनसेचा सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून पाहिलं जातं. मोरे यांनी 2007 ते 2022 अशी जवळपास 15 वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलं आहे. तर 2 वेळा 2009 आणि 2019 मध्ये मोरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक लढवली. पण दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. वसंत मोरे यांचा कात्रज मतदार संघ देखील बारामती लोकसभा मतदारसंघात येतो.

बाबू वागस्कर यांची ताकद किती?

बाबू वागस्करांची देखील शहरात ताकद आहे. बाबू वागस्कर यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषवलं आहे. त्यांची पत्नी देखील एकदा नगरसेवक होती. वागस्करांची त्यांच्या मतदारसंघावर पकड आहे. पण लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्रफळ बघता वागस्कर किती टिकतील हे सांगणं कठीण आहे.

Political Explainer
Narendra Modi: '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा'; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

किशोर शिंदे यांची ताकद किती?

किशोर शिंदेंनी देखील 2007 ते 2017 या दोनवेळा नगरसेवकपद भूषवलं आहे. तर 2009, 2014 आणि 2019 या तीन वेळा कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. किशोर शिंदे यांना तीन वेळा अपयश आलं. पण शिंदे यांची नेहमी चर्चा झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com