आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात मनसेमध्ये मोठे बदल होणार असून भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळालीये. ज्या पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी कामे केली नाहीत त्यांच्या जागी नवीन चेहरे देण्यात येणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि विभाग अध्यक्ष यांना मतदार संघात मोठे कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन वर्षात राज ठाकरे नवीन चेहऱ्यांना संधी देणार. पुढील आठवड्यातच भाकरी फिरलेली दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन जबाबदारी देणार असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मनसेमध्ये अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहेत.
अनेक ठिकाणी जी मंडळी काम करत आहेत तेथे त्यांना आणखी चालना मिळेल. ज्या व्यक्ती काम करत नाहीत त्यांना तेथेच थांबवले जाईल. प्रत्येक पक्षात ही प्रक्रिया होते त्याप्रमाणे आमच्या पक्षात देखील ही प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी होणं गरजेचं आहे. निवडणूक जिंकायची तर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्राउंडलेवला काम करणारा प्रत्येक सैनिक ताकदीचा असावा. त्यामुळे असा ताकदीचा सैनिक उभं करणं पक्षाचं काम आहे, हे काम पक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.