सुशांत सावंत
Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई-विरार, भिवंडीच्या विकासावर मोठं भाष्य केलं आहे. 'मेट्रोच्या प्रकल्पाला आपण वेग देत आहोत. मेट्रो उत्तनपर्यंत नेण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. वसई-विरार, भिवंडी हा सर्व भाग आपल्याला मेट्रोच्या जाळ्यात आणायचा आहे, असं मोठं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस यांनी मिरा-भाईंदरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना म्हटले, 'ज्यावेळी पुरुष वक्ते बोलायला आले, तेव्हा पुरुषानी टाळ्या वाजवल्या आणि गीता जैन बोलायला आल्या, तेव्हा महिलांनी. हा कुठला मिरा-भाईंदरमध्ये भेद आहे? कॅन्सर रुग्णालय हे बांधत आहात, त्यामध्ये महत्वाचे उपचार होणार आहेत, ते इथे मिळाले तर त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी जो काही निधी लागेल तो राज्य सरकार देईल'.
'उर्दू शाळेचे देखील आपण लोकार्पण केले. ईदच्या दिवशी आपणही शाळा सुरू करतोय. सीसीटीव्हीचे लोकार्पण आपण केलंय, याला आवश्यक तो सर्व निधी आपण देऊ, एक सेंटर सुरू करता येईल. रस्त्यावरील गुन्हे यामुळे रोखता येईल. ट्रॅफिकच्या खूप समस्या सोडवता येतील, असे फडणवीस म्हणाले.
'मुंबई शहराचा जेव्हा विस्तार होत होता, तेव्हा ठाणे हे दुसरं शहर सुरू होत होतं. त्याचवेळी मिरा भाईंदर तयार होत होतं. मोठ्या प्रमाणात लोक मिरा-भाईंदरमध्ये आले. या शहरांचा वेग झपाट्याने होत आहे. 2014 नंतर आपण या शहरांच्या परिवर्तनामध्ये आपण विशेष लक्ष घातलं, असेही फडणवीस म्हणाले.
'सूर्या प्रकल्पाचे काम 70 ते 80 टक्के काम झाले आहे, लवकरच ते पूर्ण होईल. येत्या वर्ष दीड वर्षात हे प्रश्न सुटतील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटेल. मेट्रोचा प्रकल्पालाही आपण वेग देत आहोत. मेट्रो उत्तनपर्यंत नेण्याचा निर्णय आपण केलेला आहे, अशी महत्वाची माहिती फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'वसई-विरार, भिवंडी हा सर्व भाग आपल्याला मेट्रोच्या जाळ्यात आणायचा आहे. नवीन सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली. मधल्या काळात वेग थांबला होता. आपल्या विकासाच्या गाडीला लाल झेंडा दाखवला होता. मात्र आठ महिन्यात बदल झाला आणि आपण हिरवा झेंडा दाखवला. मागील अडीच वर्षात निधी कुणी दिला याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल. झपाट्याने हे शहर बदलत आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.