Maharashtra Politics: 'अजित पवार आमच्या सोबत आले, तर...; मंत्री संदीपान भुमरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sandeepan Bhumre News: अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv

Sandipan Bhumre News: अजित पवार यांच्या भाजप प्रवेशांच्या वृत्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं आहे. 'अजित पवार यांची खदखद लवकर बाहेर येईल. अजित दादा आमच्या सोबत आले तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया भुमरे यांनी अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर दिली. (Latest Marathi News)

मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री भुमरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 'संजय राऊत यांना टीका करण्याशिवाय दुसरी काम नाही. पात्रता नव्हती तर एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाते का दिले? संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी मते का मागितली? असा सवाल भुमरे यांनी केला.

Maharashtra Politics
Delhi Liquor Policy Case : खासदारानं ईडीलाच पाठवली नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

संदीपान भुमरे पुढे म्हणाले, 'महविकास आघाडी फक्त निवडणूक पूर्णतः आहे. तर राज्य सरकारने कोणत्या योजेनेला स्थगिती दिली नसल्याचा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी माहिती दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असल्याचेही भुमरे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही भुमरे यांनी भाष्य केलं. 'अजित पवार यांची खदखद लवकर बाहेर येईल. अजित दादा आमच्या सोबत आले तर त्यांचं स्वागत आहे'.

Maharashtra Politics
Prakash Ambedkar : वंचितची महाविकास आघाडीमध्ये एन्ट्री होणार का?; पवार आंबेडकरांच्या भेटीत काय घडलं?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुमरे यांनी भाष्य केलं. 'जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही आहे. मात्र लवकर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये युती म्हणून आम्ही लढणार आहेत आणि जिंकणार आहे, असा विश्वास संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com