मुख्यमंत्र्यांची ऑफर आली असली तरीही, मी राज ठाकरेंसोबतच राहणार; वसंत मोरेंच स्पष्टीकरण

सोमवारी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेईल १०० टक्के मनसेत राहील, म्हणूनच मनसे चा बॅच लावून आहे.
Vasant More
Vasant MoreSaam TV
Published On

पुणे : 'मी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोबतच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवस झाले शिवसेनेत येण्याची ऑफर जरी दिली असली तरीही. मी महाराष्ट्र सैनिक आणि राज ठाकरे यांच्या सोबतच राहील.' असं स्पष्टीकरण मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज दिलं आहे.

वसंत मोरेंना (Vasant More) त्यांच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर ते पक्ष सोडणार की काय, तसंच ते कोणत्या पक्षात जाणार अशा चर्चा सुरु होत्या. शिवाय त्यांना राष्ट्रवादीने पक्षात येण्याची ऑफर दिली होती तर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील त्यांना 'अजून एकदा फेरविचार करा, आणि निर्णय घ्या;' असा फोन केला होता. त्यामुळे राजकीय वातावरणात तर्क वितर्क लढवले जात असतानाच आता त्यांनी आपण मनसेत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ते म्हणाले, वसंत मोरे आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. प्रत्येक पक्षाच्या लोकांना मी सांगतोय की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस आहे. माझी हकालपट्टी झाली या शब्दावरून माझे कार्यकर्ते कालपासून नाराज आहेत. हकालपट्टी पक्षातून होते पदावरून नाही. सोमवारी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेईल १०० टक्के मनसेत राहील. म्हणुनच मनसे चा बॅच लावून आहे असही ते म्हणाले आहेत.

काय होती ऑफर -

Vasant More
Breaking: वसंत मोरे यांना सेनेत घेण्यास खुद्द उद्धव ठाकरेच उत्सुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना फोन करुन त्यांनी शिवसेनेत येण्याबाबत फेरविचार करावा अशी ऑफर दिली होती. मात्र त्यांना आता आपण मनसेसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com