Devendra Fadnavis On India Meeting: मोदी आमचे PM पदाचे उमेदवार, तुमचे कोण?, फडणवीसांचा थेट हल्लाबोल

Mahayuti Meeting In Mumbai: याच बैठकीतून देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी इंडिया आघाडीसह विरोधकांवर टीका केली आहे.
Devendra Fadnavis On India Meeting
Devendra Fadnavis On India MeetingSaam tv
Published On

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: सध्या मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (India Aghadi Meeting) सुरु आहे. तर दुसरीकडे महायुतीने देखील बैठकीचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत.

या बैठकीमध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांवर चर्चा सुरु आहे. याच बैठकीतून देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी इंडिया आघाडीसह विरोधकांवर टीका केली आहे. त्याचसोबत 'आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी, तुमचे कोण?', असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

Devendra Fadnavis On India Meeting
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी बैठकीवर टाकी करताना असे सांगितले की, 'विरोधक जेव्हा एखाद्याला खात्री करून देऊ शकत नाही, तेव्हा कन्फ्युज करण्याचे काम करत आहेत. आमचे सर्व मित्रपक्ष फेविकॉलचा जोड आहेत. हे तुटणार नाहीत. इथे कुणालाच प्रश्न पडला नाही आमची जागा नेमकी कुठे आहे. ममता दीदी आल्या. त्यांना कुणी खुर्ची दिली नाही. पवारसाहेबांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत. पवार साहेबांनी अजितदादा यांना पण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते पण थांबले नाहीत.

Devendra Fadnavis On India Meeting
Moody's GDP Forecast: 'मूडीज'ने दिली गुड न्यूज! भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढीचा अंदाज

'आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी आहेत. तुमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण?', असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला आहे. 'रोज नवे नवे नाव समोर येते आहेत. पण ज्यांनी बैठकीचे आयोजन केले त्यांचं नाव येतच नाही. इंडिया आघाडीची भेंडी आघाडी झाली. लोगो तयार करणार पण लोगोसुद्धा आला नाही. रंग कोणता? २६ पक्ष? प्रत्येकाचे रंग वेगळे. त्यांचं आपण स्वागत केले. पण त्यांना आपण परत पाठवू.', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis On India Meeting
INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या समन्वय समितीची घोषणा; शरद पवार, संजय राऊतांसह १४ नेत्यांवर मोठी जबाबदारी

'आज भाजप, एनसीपी आणि शिवसेनेचे सरकार आहे. आपला अजेंडा विकासाचा आहे. महाराष्ट्राला आणि देशाला उच्च शिखरावर कसं नेता येईल हा अजेंडा घेऊन आपण एकत्र आलो आहोत. कालपर्यंत भारताला नाव ठेवणाऱ्या संस्था आता मोदींचे कौतुक करत आहेत. जपानमध्ये प्रत्येक ठिकाणी मोदींचे कौतुक होत आहे. जे आम्ही केलं नाही ते भारताने केले. याचं कौतुक जपानला आहे. आपली अर्थव्यवस्था इंग्रजांना मागे टाकून ५ वी अर्थव्यवस्था झाली. भारत ही २०३० साली जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.', असा देखील विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis On India Meeting
Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकरांची 'इंडिया' आघाडीत जायची इच्छा; अडलंय कुठं?, स्वतःच सांगितली कारणं

यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'काही लोक म्हणतात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्लान झाला. उद्धव ठाकरे नेहमी बोलतात त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. मुंबई कुणी तोडू शकत नाही. कुणाच्या बापाची ताकद नाही. यांनी कधीच विकास होऊ दिला नाही. कायम मराठी माणसात भय ठेवलं. मुंबईच्या विकासाला जो विरोध करतो तो महाराष्ट्रद्रोही.' तसंच, 'एकनाथ शिंदे यांच्या नेतत्वाखालील मुंबईचा आता खरा विकास होतोय. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला. पण आता कोणी बाहेर जाणार नाही. मराठी माणसाला मुंबईत घर देणार.', अशी घोषणा फडणवीसांना केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com