Moody's GDP Forecast: 'मूडीज'ने दिली गुड न्यूज! भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढीचा अंदाज

India GDP News: 'मूडीज'ने दिली गुड न्यूज! भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढीचा अंदाज
Moody's GDP Forecast
Moody's GDP ForecastSaam Tv
Published On

Moody's Investors Service On India GDP: मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody's Investors Service) पुन्हा एकदा एक गुड न्युज दिली आहे. देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. मूडीजने 2023 साठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यापूर्वी जीडीपी वाढीचा दर 5.5 टक्के असण्याचा अंदाज होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा जीडीपी 7.8 टक्के दराने वाढला आहे.

Moody's GDP Forecast
Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

मूडीजने आपल्या 'ग्लोबल मॅक्रो आउटलुक'मध्ये म्हटले आहे की, 'मजबूत सेवा विस्तार आणि भांडवली खर्चामुळे भारताची खरी जीडीपी वाढ दुसऱ्या (एप्रिल-जून) तिमाहीत 7.8 टक्के झाली आहे. म्हणून वर्ष 2023 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 5.5 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. (Latest Marathi News)

एप्रिल-जून तिमाहीत 7.8 टक्के

मूडीजने आपल्या ग्लोबल मॅक्रो आउटलुकमध्ये म्हटले आहे की, सेवांमध्ये चांगली वाढ आणि भांडवली खर्चात वाढ झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत भारताची वास्तविक जीडीपी वाढ 7.8 टक्के होती.

Moody's GDP Forecast
SBI Best FD Schemes: एसबीआयच्या या दोन FD योजना आहेत जबरदस्त, गुंतवणुकीवर इतका मिळतो व्याजदर

दरम्यान, आगामी तिमाहींबद्दल बोलायचे झाले तर रिझर्व्ह बँकेने जुलै-सप्टेंबर 2023 या तीन महिन्यांसाठी आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की, वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 6 टक्के असू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com