INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या समन्वय समितीची घोषणा; शरद पवार, संजय राऊतांसह १४ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Political News : इंडियामध्ये योग्यरित्या समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी समन्वय समितीवर असणार आहे.
INDIA
INDIASaam TV
Published On

गिरीश कांबळे

INDIA Meeting :

इंडिया आघाडीची महत्वाचे बैठक मुंबईत पार पडत आहे. २६ पक्षांची ही आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत एडीएला सक्षम पर्याय म्हणून पुढे आली आहे. २६ पक्षांमधील अनेक बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. २६ पक्षांशी एकत्रित संवाद साधण्याचं मोठं आव्हान INDIA समोर असणार आहे.

इंडियामध्ये योग्यरित्या समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी समन्वय समितीवर असणार आहे. १३ जणांच्या समितीची घोषणा आज झाली आहे. यामध्ये राज्यातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जबाबदारी असणार आहे. (Political News)

INDIA
PM Narendra Modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढणार? भाजप नेते संजय काकडे म्हणाले...

इंडियाची समन्वय समितीत कुणाचा समावेश?

  1. केसी वेणूगोपाल

  2. शरद पवार

  3. एम के स्टेलिन

  4. संजय राऊत

  5. तजस्वी यादव

  6. अभिषेक बॅनर्जी

  7. राघव चड्डा

  8. जावेद खान

  9. ललन सिंग

  10. हेमंत सारेन

  11. मेहबूबा मुफ्ती

  12. डी राजा

  13. ओमर अब्दुला

  14. टी आर बालू

लोकसभेच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचा ठराव इंडिया आघाडीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प इंडियाने केला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून निवडणुकांना सामोरे जाणार, असल्याचंही आज ठरलं आहे. (Latest News Update)

INDIA
Sushma Andhare : कलम ३७० हटवून काय दिवे लावले?, 'इंडिया'वर टीका करणाऱ्या भाजपला सुषमा अंधारेंचा खडा सवाल

महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या विविध भागांमध्ये लवकरात लवकर सार्वजनिक रॅली आयोजित करणार असल्याचंही आजच्या बैठकीत ठरलं आहे. विविध भाषांमध्ये जुडेगा भारत, जितेगा भारत या थीमसह संवाद आणि माध्यम धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. (Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com