Parth Pawar: मोठी बातमी! पार्थ पवारांना मिळणार वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Parth Pawar Y+ Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Parth Pawar Y+ Security News
Parth Pawar Y+ Security News Saam TV

Parth Pawar Y+ Security News

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Parth Pawar Y+ Security News
Parbhani Lok Sabha: संजय जाधव पुन्हा निवडून आले तर ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जातील; वंचितच्या उमेदवाराचं भाकित

राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

कार्यकर्ते तसेच मतदारांच्या भेटीगाठी वाढल्याने पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ⁠खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पुणे पोलिसांना पत्र लिहत युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. आमदार रोहित पवार तसेच युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका आहे. त्यांना तातडीने सुरक्षा द्या, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

वाय प्लस सुरक्षा कुणाला दिली जाते?

मंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना वाय प्लस सुरक्षा देण्यात येते. या श्रेणीत १० सुरक्षा रक्षक तैनात असतात. यात दोन पर्सनल सिक्‍युरिटी ऑफिसर्सचाही (पीएसओ) समावेश असतो. एक 'वाय प्लस' सुरक्षा देण्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च येतो.

Parth Pawar Y+ Security News
Sambhajinagar Lok Sabha: संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; महायुतीचा उमेदवार बदलणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com