Sambhajinagar Lok Sabha: संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; महायुतीचा उमेदवार बदलणार?

Maharashtra Lok Sabha 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. २२) मध्यरात्री मराठा समन्वयक विनोद पाटील यांची भेट घेतली आहे.
Sambhajinagar Lok Sabha 2024
Sambhajinagar Lok Sabha 2024 Saam TV

Sambhajinagar Lok Sabha 2024

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. २२) मध्यरात्री मराठा समन्वयक विनोद पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा उमेदवारीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीने संभाजीनगरमधील उमेदवार बदलावा, अशी विनोद पाटील यांची मागणी आहे.

Sambhajinagar Lok Sabha 2024
Abu Azmi News: मोठी बातमी! अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!

याबाबत विनोद पाटील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, विनोद पाटील यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतील आणि मार्ग निघेल, असं उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) महायुतीने संदीपान भुमरे यांनी उमेदवारी जाहीर केल आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होताच मराठा समन्वयक विनोद पाटील नाराज झाले आहेत. महायुतीने या मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत सोमवारी रात्री ९ वाजता विनोद पाटील यांची भेट घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये पोहचले. दोन्ही नेत्यांमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत गुप्तपणे चर्चा सुरू होती. आपण विनोद पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असून लवकरच यावर मार्ग निघेल, असं उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं.

माझे आणि विनोद पाटील यांचे २५ वर्षापासून घनिष्ठ संबंध आहे. आमच्या दोघांमध्ये जी चर्चा झाली, त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगेन आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करेल. मुख्यमंत्री शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर जाणार आहेत. तेव्हा विनोद पाटील त्यांची भेट घेणार आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

दुसरीकडे उदय सामंत यांनी मला विनंती केली आहे की, आमच्या उमेदवाराला मदत करावी. मात्र, तातडीचा सर्वे घेऊन मला उमेदवारी द्यावी आणि मोदींना मदत करणारा खासदार केंद्रात पाठवावा अशी मागणी मी उदय सामंत यांच्याकडे केल्याचं विनोद पाटील म्हणाले.

ही लढाई मला ताकतीने जिद्दीने लढायची आहे. कुणाचाही विरोध नाही तर विकासासाठी आम्हाला लढायचे आहे. उद्या मुख्यमंत्री येणार आहे त्यांचे मी स्वागत करेल. भुमरे यांनी अर्ज भरला, मात्र एबी फॉर्म त्याला अजून जोडलेला नाही. पण त्यांनी काय केलं त्याच्या खोलात मला जायचं नाही. मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे, असंही विनोद पाटील म्हणाले.

Sambhajinagar Lok Sabha 2024
Raigad Lok Sabha: सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; रायगडमध्ये आज 'मविआ'ची जाहीर सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com