देवेंद्र फडणवीसांचीही इतिहासात नोंद झाली असती; अजित पवारांचा खोचक टोला!

आज पुण्यात बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Ajit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar on Devendra Fadnavis, NCP Latest News, Political News in Marathi
Ajit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar on Devendra Fadnavis, NCP Latest News, Political News in MarathiSaam Tv
Published On

पुणे : काही दिवसापासून मनसेच्या (MNS) मशिदींवरील भोंग्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा राज्य सरकारला अल्टीमेट दिला होता, मनसेने भोंग्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी भोंग्यासंदर्भात आंदोलन केले, त्याच व्यक्तीने पुणे-मुंबईच्या टोल नाक्याविरोधात काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला गर्दी झाली होती, पण याचं पुढं काय झालं? या व्यक्तीने जी जी आंदोलने केली ती फेलं गेली, अशी टीका अजित पवार यांनी राज ठाकरे (Raj Thckeray) यांचं नाव न घेता केली. (Ajit Pawar on Devendra Fadnavis)

दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद विषयी विधान केले होते. यावर अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.'१८५७ च्या लढ्यात झाशीची राणी, तात्या टोपे यांच्यासह लढले असते तर चांगली गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीसांचीही इतिहासात नोंद झाली असती. त्यांच्या बोलण्याचे आपण स्वागत करु असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Ajit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar on Devendra Fadnavis, NCP Latest News, Political News in Marathi
किआन अमित ठाकरे! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ जाणून घ्या...

भोंगा आंदोलनावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्यांनी भोंग्यासंदर्भात आंदोलन केले त्याच व्यक्तीने आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. यावेळी गर्दी झाली होती पुढे काय झालं? या व्यक्तीने जी जी आंदोलनं केली ती नुकसानीची होती, टोलचं आंदोलन फेलं गेलं, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला. मागे एकदा म्हणाले युपी बिहारवाले चले जाव, त्याने सर्व बांधकामं बंद पडली. शेवटी भूमिका बदलावी लागली. यावेळी त्यांनी भूमिका बदलली. काही व्यक्तींना न खर्च करता प्रसिद्धी मिळते, असा टोलाही लगावला.

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोप पत्रातून संभाजी भिडे यांचे नाव वगळल्या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले, आयोगाची चौकशी सुरू आहे, अहवाल आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com