रुपाली बडवे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं आज बारसं होतं. यावेळी राज ठाकरेंच यांच्या नातवाचं नाव किआन असं ठेवण्यात आलंय. आज शिवतीर्थवार फुलांची सजावट करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना ५ एप्रिल २०२२ ला पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने ठाकरे परिवारात उत्सवाचं वातावरण आहे. मुलगा अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यानंतर आज बाळाचं बारसं करण्यात आलं. यावेळी बाळाचं नावं किआन (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. (what is the meaning of kiaan)
हे देखील पाहा -
किआन नावाचा अर्थ (Kiaan Name Meaning in Marathi)
किआन हे एक हिंदु नाव आहे. या नावाचा अर्थ 'विष्णुचा अवतार' असा आहे. तसेच प्राचीन आणि देवाची कृपा असलेला असाही या शब्दाचा अर्थ होतो.
अमित ठाकरे आणि मिताली अमित ठाकरे यांना ५ एप्रिल २०२२ ला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. मिताली या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला होता. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी स्थलांतरीत झाले आहेत. या नव्या घरी आता राजकारणासह चिमुकली पावलंही नांदणार आहे. शर्मीला ठाकरे आजी झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.