Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या विरोधात राज्यात संताप, राजीनाम्याची मागणी; कारण काय?

Demand for Rupali Chakankar Resignation : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगाविरोधात संतापाची लाट उसळलीय. त्यात आता महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केलीय.
Demand for Rupali Chakankar Resignation
Demand for Rupali Chakankar ResignationSaam Tv News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

पुणे : गेल्या काही दिवसांपासून असाच संताप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात राज्यभर व्यक्त केला जातोय. या संतापाला कारण ठरलयं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. हगवणेंच्या मोठ्या सुनेनं केलेल्या तक्रारीवर आयोगानं वेळीच कारवाई केली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा एवढ्या प्रमाणात वाढली की महिला आयोगासंदर्भात उपसभापतींना एक बैठक बोलवावी लागली.या बैठकीत मविआच्या महिला नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली

महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मात्र, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पाठराखणच केली आहे.

Demand for Rupali Chakankar Resignation
Corona News : केंद्राकडून कोरोना अलर्ट, देशात ४ हजार रुग्ण; मार्गदर्शक सूचना जाहीर

एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणावरून आयोगावर टीका होत आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये शेकडो महिलांनी ऊसतोड मजुरीवर जाण्याआधी स्वतःची गर्भपिशवी काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केलाय.

राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. पण आयोगातील रिक्त पदसंख्या,वाढता घरगुती हिंसाचार, वैष्णवी हगवणेसारख्या प्रकरणातील बोटचेपी भूमिका अशा प्रकरणामुळे महिला आयोगचं एक समस्या बनलं आहे. महिला आयोग खरच यापुढे तरी महिलांच्या समस्याबाबत जागरूक राहणार की पुन्हा पोलिसांकडे बोट दाखवत आपला बचाव करत राहणार ? हा प्रश्न आहे.

Demand for Rupali Chakankar Resignation
IPL 2025 Final : पंजाब बंगळुरूवर वरचढ! किंग्सच्या गोलंदाजांची कमाल; २०० धावांच्या आत आरसीबीला रोखलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com