
IPL 2025 च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २० ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने १९० धावा केल्या. आता पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी १९१ धावा कराव्या लागणार आहेत.
फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे बंगळुरूचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत १२ धावा केल्यानंतर फिल सॉल्ट कॅचआउट झाला. त्याने एकूण १६ धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवाल तिसऱ्या क्रमावर फलंदाजी करण्यासाठी आला. युजवेंद्र चहलच्या ओव्हरमध्ये मयंक अग्रवाल बाद झाला. मयंकने १८ चेंडूत २८ धावा केल्या. पॉवर प्ले संपेपर्यंत बंगळुरूची धावसंख्या ५५ अशी होती.
चौथ्या क्रमावर खेळण्यासाठी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आला. विराट-रजत यांनी खेळ पुढे नेला. १० ओव्हरपर्यंत बंगळुरूची धावसंख्या ८७ इतकी होती. १६ चेंडूत २६ धावा करत रजत पाटीदार माघारी परतला. सॉल्टनंतर काइल जेमिसनने रजतच्या रुपात दुसरी विकेट घेतली. १२ ओव्हरनंतर आरसीबीची धावसंख्या १०० पार गेली. लियान लिव्हिंगस्टोन फलंदाजीसाठी आला.
विराट कोहलीने लियान लिव्हिंगस्टोनसोबत भागीदारी केली. पंधराव्या ओव्हरमध्ये अझमतुल्ला ओमरझाईने कॅच पकडून विराट कोहलीला बाद केले. त्याने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. विकेटकिपर जितेश शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. जितेश आणि लिव्हिंगस्टोन यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. पण त्या प्रयत्नात लिव्हिंगस्टोनची विकेट पडली. त्याने १५ चेंडूत २५ धावा केल्या. काइल जेमिसनने तिसरी विकेट घेतली.
लियाम लिव्हिंगस्टोनच्या नंतर जितेश शर्मा हिटविकेट झाला. विजयकुमार वैशाखने जितेशला बाद केले. त्याने १० चेंडूत २४ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये रोमारियो शेफर्डने फटकेबाजी करत १७ धावा केल्या. अर्शदीप सिंहने शेफर्डला बाद केले. त्यानंतर कृणाल पंड्या कॅचआउट झाला त्याने फक्त ४ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार कॅचआउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने ३ विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.