Dawood Ibrahim: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला खाण्यातून विषबाधा की विषप्रयोग? उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

Dawood Ibrahim Latest news in Marathi : दाऊदवर कराचीत विषप्रयोग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. याच दाऊदला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
mumbai serial blasts mastermind dawood ibrahim
mumbai serial blasts mastermind dawood ibrahim Saam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Dawood Ibrahim Latest news:

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषाचा प्रयोग झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. दाऊदवर कराचीत विषप्रयोग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. याच दाऊदला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

दाऊदला खाण्यातून विषबाधा की विषप्रयोग?

दाऊद इब्राहिमला प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताची मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी पुष्टी केली. गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता दाऊदला डिस्चार्ज देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं. मात्र, दाऊदवर खाण्यातून विषबाधा की विषप्रयोग झालं हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mumbai serial blasts mastermind dawood ibrahim
Arvind Kejriwal ED Notice: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने पाठवलं समन्स, 21 डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश

मीडिया रिपोर्टनुसार, दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली. यानंतर पाकिस्तानचं इंटरनेट डाऊन झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं.

पाकिस्तानातील लाहोर, कराची, इस्लामाबादमधील सर्व्हर डाऊन झालं होतं. या व्यतिरिक्त पाकिस्तानात फेसबुक, इन्स्टाग्राम देखील व्यवस्थित सुरु नव्हतं. काल रात्री ८ वाजेपर्यंत इंटरनेट स्लो करण्यात आलं होतं.

mumbai serial blasts mastermind dawood ibrahim
Who Is Sapna Didi: भारत-पाक मॅचमध्येच दाऊदला मारण्याचा कट रचणारी लेडी डॉन! कोण होती सपना दीदी?

पाकिस्तानी पत्रकाराने काय म्हटलं?

पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमीने म्हटलं, 'दाऊदवर विषप्रयोग झाल्याची ऐकीव माहिती आहे. दाऊदला विषप्रयोगामुळे कराचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर याबाबतचं वृत्त व्हायरल झालंय. तसेच या वृत्तानंतर पाकिस्तानातील सोशल मीडिया आणि इंटरनेट सर्व्हर डाऊन करण्यात आलं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com