Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा, पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण; धरपकड सुरू, पाहा VIDEO

Marathi Ekikaran Samiti Protest: मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण करत धरपकड सुरू केली आहे.
Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा,  पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण करत धरपकड सुरू; पाहा VIDEO
Dadar Kautarkhana RadaSaam Tv
Published On

Summary -

  • दादर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचे आंदोलन.

  • पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी.

  • पोलिसांनी आंदोलक ताब्यात घेतले. पत्रकारांनाही आरेरावी केली.

  • कबुतरखान्याचा वाद मुंबईत आणखी चिघळण्याची शक्यता.

दादरमधील कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मुंबई महानगर पालिकेने हा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजाकडून त्याठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर आज कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी माणसं सहभागी झालेत. यावेळी कबुतरखाना परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिसांनी पत्रकारांनाही आरेरावी केली.

दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती तरी देखील आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. या आंदोलनापूर्वी पोलिसांनी मराठी एकीकरण समितीला नोटीस देखील दिली होती तरी देखील आंदोलन करण्यात आले त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली. यामुळे काही आंदोलक जखमी झाले.

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा,  पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण करत धरपकड सुरू; पाहा VIDEO
Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आणि ताब्यात घेतल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. यावेळी त्यांनी पोलिसांना जैन समाजातील आंदोलकांवर का कारवाई करण्यात आली नव्हती? असा संतप्त सवाल विचारला. या आंदोलनावेळी पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी देखील आरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात यावेत असे आदेश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले होते. हे कबुतरखाने बंद करण्यात आल्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी दादरमध्ये आंदोलन करत कबुतरखान्यावर झाकण्यात आलेली ताडपत्री हटवली होती. दादर कबुतरखाना प्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा शांत पाहायला मिळाले त्यांनी आजच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा,  पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण करत धरपकड सुरू; पाहा VIDEO
Dadar Kabutarkhana: कबुतरांना खायला देणं अंगाशी आलं; १.३२ लाखांचा दंड वसूल | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com