सायबर हल्ल्याची व्याप्ती वाढली! विद्यापीठे, बँकांशी संबधित १०० हून अधिक वेबसाइट हॅक

देशातील १०० हून अधिक वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
Cyber Attack in Maharashtra Latest News, Nupur Sharma Row
Cyber Attack in Maharashtra Latest News, Nupur Sharma RowSAAM TV
Published On

मुंबई: राज्यातील ठाणे पोलिसांनी वेबसाइट हॅक (website hacked) झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर या सायबर हल्ल्याची व्याप्ती वाढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Cyber Attack in Maharashtra Latest News)

१०० हून अधिक वेबसाइट हॅक झाल्याची माहिती उघड झाली आहे. सायबर विभागाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी ही माहिती दिली. (Cyber Attack)

Cyber Attack in Maharashtra Latest News, Nupur Sharma Row
'भारत सरकारने मुस्लिम धर्मियांची माफी मागावी अन्यथा...'; ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक

राज्याच्या गृहविभागातील ठाणे पोलिसांची (Police) वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. ही वेबसाइट हॅक केल्यानंतर सायबर हल्लेखोरांनी सरकारला इशारा दिला आहे. जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देणारा मजकूर ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ठाण्यातील पोलीस आयुक्तालयाची वेबसाइट पूर्ववत झाल्याचे सांगण्यात येत आहे. सहा तासांनंतर ही वेबसाइट पूर्ववत झाली असून, काही डेटा गायब झाला आहे. याचा तपास करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विद्यापीठे, बँका, पोलिसांशी संबंधित वेबसाइट हॅक

ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक झाल्यानंतर या सायबर हल्ल्याशी संबंधित आणखी मोठी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. १०० हून अधिक वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत. यात विद्यापीठे, बँका आणि पोलिसांशी संबंधित वेबसाइट आहेत. सायबर हल्लेखोरांमध्ये एक गट मलेशियाचा असून, दुसरा गट इंडोनेशियाचा आहे. ज्या संस्थांच्या वेबसाइट हॅक झाल्या आहेत, त्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी दिली.

Cyber Attack in Maharashtra Latest News, Nupur Sharma Row
Cyber Law : राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा बसणार; गृहमंत्र्यांच्या बेठकीत महत्वाचे निर्णय

गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत देशात अनेक वेबसाइट हॅक झाल्या आहेत. आपले सायबर विभाग प्रमुख याबाबत तपास करत आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक झाली आहे. राज्य सरकारने याचा आढावा घेतला असून, यावर काय उपाययोजना करायच्या, त्याबाबत यंत्रणा काम करत आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com