Pune Crime News : आधी वाहनांची तोडफोड केली, आता डोकं झोडावं लागतंय, पुणे पोलिसांच्या धडक कारवाईची चर्चा

Crime News : पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सहा जणावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आहे.
Pune Police
Pune Police Saamtv
Published On: 

सचिन जाधव

Pune News : पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवेस चिंतेचा विषय बनत आहे. राजकीय मंडळींनीही याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांना जरब यासाठी कडक कारवाई करण्यास पुणे पोलिसांनी सुरु केली आहे.

पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सहा जणावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आहे. एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारासह टोळीतील सहा जणांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

टोळीने कर्वेनगर आणि तळजाई परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत या टोळीतील चार जणांना अटक केली. (Latest Marathi News)

Pune Police
Sanjay Raut on ED Raid : ED च्या धाडीवर संजय राऊतांनी उडी; संतापून बोलले, आमच्यावर बंदुका चालवा, गोळ्या घाला!

टोळी प्रमुख पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे, राहुल विठ्ठल वांजळे, मारुती ऊर्फ मारत्या पांडुरंग टोकलवाड, हर्षद ऊर्फ बाब्या संतोष वांजवडे आणि नद्या (पूर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Crime News)

Pune Police
Kalyan Crime: कल्याण काळा तलाव परिसरात गोळीबाराचा थरार! गाड्यांचीही तोडफोड; धक्कादायक कारण समोर...

यापैकी चारजणांना अटक केली असून, एकजण फरार आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खासगी मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.