Kalyan News: कोरोनाच्या बूस्टर डोसकडे कल्याण- डोंबिवलीकरांनी फिरवली पाठ; फक्त १५ टक्के नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

Kalyan News: जेएन-1 या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आरोग्य खाते अलर्ट झाले आहे. परंतु कोरोनाच्या बूस्टर डोसकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
Kalyan Dombivli News
Kalyan Dombivli Newssaam tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण| ता. २८ डिसेंबर २०२३

Kalyan Dombivli News:

देशासह राज्यभरात काेरोनाच्या जेएन-१ (JN.1) या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवलीत या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आरोग्य खाते अलर्ट झाले आहे. परंतु कोरोनाच्या बूस्टर डोसकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

महापालिका हद्दीत आत्तापर्यंत १ लाख ७३ हजार ९३ जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात बूस्टर डोस घ्यावा.. असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे .

कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli) हद्दीत कोराेनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या पाच आहे. मात्र त्यापैकी एकही रुग्ण नव्या व्हेरियंटचा नाही. नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. महापालिकेच्या रुक्मीणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या विविध नागरीक आरोग्य केंद्रावरुन बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र बूस्टर डोस घेण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. महापालिका हद्दीतील ११ लाख ४२ हजार ३७५ जणांनी काेरोनाचा (Corona) पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसची टक्केवारी ७३ टक्के आहे, तर ११ लाख १ हजार २१८ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Dombivli News
Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उद्घाटनांचं निमंत्रण देणारा भाजप कोण?, नाना पटोलेंचा सवाल

त्यामुळे या दोन्ही डोसच्या तुलनेत बूस्टर डोसची टक्केवारी अवघी १५ टक्के आहे. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण थंडावले. ते आजही थंडावलेलेच आहे.नव्या व्हेरीयंटमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये त्रिसूत्रीचे पालन करावे ,लक्षण दिसल्यास तत्काळ डॉक्टराशी संपर्क साधावा, बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)

Kalyan Dombivli News
Jalana News: आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा... बंजारा समाजाची मागणी; जालना- परभणी महामार्गावर 'रास्ता रोको'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com