Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उद्घाटनांचं निमंत्रण देणारा भाजप कोण?, नाना पटोलेंचा सवाल

Ayodhya Ram Mandir Construction Update : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून देशभारातील मान्यवरांना निमंत्रण दिलं जात आहे. मात्र भाजप निमंत्रण देणारी कोण? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaSaam Digital

Mumbai News :

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला आता काहीच दिवस उरले आहे. मात्र राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राज्यात आणि देशात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून देशभारातील मान्यवरांना निमंत्रण दिलं जात आहे. मात्र भाजप निमंत्रण देणारी कोण? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाना पटोले यांनी म्हटलं की, राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण देणारी भाजप कोण आहे. या सोहळ्याला काँग्रेस जाणार नाही, याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. भाजपने श्रीरामाचा ठेका घेतला का? प्रभू राम आमचेही श्रद्धास्थान आहेत. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ. हे निमंत्रण देणारे कोण होतात, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही - शरद पवार

राम मंदिर उभारलं ही चांगली गोष्ट आहे आणि याचा मला आनंदच आहे. मात्र मला या उद्घाटन सोहळ्याचे कोणतेही निमंत्रण प्राप्त झालेले नाही. निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही. अशा धार्मिक कार्यक्रमांना मी सहसा जात नाही. माझी काही श्रद्धास्थानं आहेत. मी तिथे जातो. मात्र, त्याचे जाहीर प्रदर्शन करणं मला आवडत नाही अशा शब्दात त्यांनी या विषयावरील आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रभू रामाचे निमंत्रण देणारे भाजप कोण आहे? - संजय राऊत

राम मंदिर हा एका पार्टीचा प्रोग्राम आहे. हा पार्टीचा विषय आहे. त्यांनी प्रभू रामाला पूर्णपणे किडनॅप केलं आहे. प्रभू रामाचे निमंत्रण देणारे भाजप कोण आहे? भाजपचा हा चुनावी जुमला आहे. पार्टीच्या प्रोग्राममध्ये कोणाला बोलवायचे कोणाला नाही ती त्यांची मर्जी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com