भोंदू बाबाला अटक! महिलांना तंत्रा-मंत्रात अडकवून भागवायचा शरिराची भूक
भोंदू बाबाला अटक! महिलांना तंत्रा-मंत्रात अडकवून भागवायचा शरिराची भूकसूरज सावंत

भोंदू बाबाला अटक! महिलांना तंत्रा-मंत्रात अडकवून भागवायचा शरिराची भूक

कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) एका अशा भोंदू बाबाला अटक केली आहे की, ज्याची भोंदूगिरी ऐकली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल़.
Published on

मुंबई: कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) एका अशा भोंदू बाबाला अटक केली आहे की, ज्याची भोंदूगिरी ऐकली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल़. हा भोंदू बाबा मनाने रस्ता असलेल्या भयभीत झालेल्या आणि संकटात अडकलेल्या महिलांना सावज म्हणून हेरायचा आपल्या शरीराची भूक भागवायचा.

संबंधीत भोंदूबाबचे आलिशान ऑफिस आहे. कांदिवली आणि बोरिवली परिसरातल्या हाय प्रोफाईल परिसरात त्यानं आपलं थांड मांडला आहे. मात्र या भोंदूबाबाचा भोंदूपणा पोलिसांनी उघड केला आहे. हा बाबा कसा भोंदुगिरी करतो आणि आपल्या वासनेचा शिकार महिलांना कसा बनवतो. सगळ काळं कृत्य इथल्या एका महिलेने उघड केले आहे. इथल्या एका सेवादार महिलेनं पोलिसात या भोंदू बाबा विषयी तक्रार दिली. पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली. भोंदू बाबाचा नाव प्रणव शुक्ला आहे. 2010 -11 मध्ये या महिलेच्या घरात पती सोबत ची खूप भांडणं होत होती. भांडण टोकाचा असायचं. आपल्या घरामध्ये होणारा कलह लक्षात घेता एखाद्या बाबाला सांगून काही उपाय करावा असं त्या महिलेला वाटलं. मग महिला या भोंदू बाबाच्या संपर्कात आली.

भोंदू बाबाला अटक! महिलांना तंत्रा-मंत्रात अडकवून भागवायचा शरिराची भूक
पोलीस निरीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून पैशाची मागणी

माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. माझ्याकडे तंत्र मंत्र याची संपूर्ण माहिती आहे. या तंत्र-मंत्र जोरावर मी तुझा संपूर्ण कौटुंबिक कलह दूर करेन अशी बतावणी या बाबांना आपल्या शैलीत या महिलेला दिली. मग महिला या बाबा कडून अंगारे-धुपारे घेऊ लागली. ही महिला रोज या बाबाकडे येऊ लागली. या भोंदू बाबांना आपल्या बोलण्यात या महिलेला गुंतवून टाकलं. आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला. काहीतरी विपरीत घडते आहे तिच्या लक्षात येऊ लागलं. त्यानंतर या महिलेने थेट घाठलं ते कांदिवली पोलिस स्टेशन. पोलिसात तक्रार झाली आणि त्यानंतर पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा भोंदू बाबा. कांदिवली बोरिवली परिसरातल्या हायप्रोफाईल भागात आपलं ऑफिस बनवायचा आणि तिथून येणाऱ्या भक्तांना गंडा घालायचा. घडला प्रकार हा दुर्दैवी आहे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहे मात्र भोंदूगिरी च्या आहारी जाऊन आपलं सर्वस्व गमावूनव बसू नका हीच अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com