Congress Protest : रेल्वे वाहतूक विस्कळीत! काँग्रेस कार्यकर्त्यांचं लोकल ट्रेनवर चढून आंदोलन, प्रकरण काय?

Congress Protest by Blocking Local Trains : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवली.
Congress protests by boarding Lonavala local train
Congress protests by boarding Lonavala local trainSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीचा कळस गाठला आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा लोकल ट्रेन रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, 'भाजपकडून सुरु असलेली ही राजकीय सूडाची साखळी आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधींवर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही. रस्त्यावर उतरून, रेल्वे अडवून, सरकारला हादरवण्याचं काम युवक काँग्रेस करणार!'

Congress protests by boarding Lonavala local train
Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले, 'नॅशनल हेरॉल्ड प्रकरण फक्त एक निमित्त आहे. सत्य बोलणाऱ्या राहुल गांधींना धाक दाखवण्याचा हा डाव आहे. पण आम्ही ही इडी, सीबीआय, नोटीसांची भाषा समजून घेतली आहे. जर आमच्या नेत्यांना छळाल तर प्रत्येक युवक काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारेल.'

पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करताना म्हटले, 'पुणे शहरातून आम्ही हे स्पष्ट करतो की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आमचे अभिमानाचे नेते आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला तर पुणे युवक काँग्रेस शांत बसणार नाही. आज ट्रेन थांबवली आहे, उद्या राज्य थांबवू , इतकं लक्षात ठेवा!

या आंदोलनामुळे काही काळासाठी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना तातडीने हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. युवक शिवराज मोरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, तारीख बागवान, प्रथमेश आबनावे, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये, मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे, आदी उपस्थित होते.

Congress protests by boarding Lonavala local train
Shocking News: क्षुल्लक वाद जीवावर बेतला! पतीने ९ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा आवळला, जगात येण्यापूर्वी बाळाचाही मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com