पोलीस महासंचालक पदावर पुन्हा रश्मी शुक्ला यांची वापसी होऊ शकते. त्यांना पुन्हा सेवेवर घेतलं जाऊ शकते, त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेऊ नये म्हणून काँग्रेसने फिल्डिंग लावणं सुरू केलंय. काँग्रेसने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून काँग्रेसने ही याचिका दाखल केलीय. सध्या रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलंय. परंतु शुक्ला यांचं सेवेत पुनरागमन होऊ शकते,अशी शक्यता दिसताच काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतलीय. शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेऊ नये म्हणून काँग्रेसने याचिका दाखल केलीय. संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून कायम करावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिलाय.
निवडणूक आयोगाच्या आदेशाची राज्य सरकारने तंतोतंत पालन करावे. त्याची अंमलबजावणी करावी. रश्मी शुक्ला या निवृत्त आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटवल्यावरती सक्तीच्या रजेवर पाठवता येणार नाही. त्यांना निवृत्त घोषित करावे, अशी मागणी काँग्रेसने आपल्या याचिकेद्वारे केलीय.
निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती. आता मात्र शुक्ला यांना निवृत्त घोषित करावे, अशी मागणी आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसच्याच मागणीवरून निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्यात आलीय. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी शुक्ला यांना बेकायदेशीर मुदतवाढ देण्यात आली त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
उच्च पदावर असलेल्या शुक्ला कोणत्या पक्षासाठी काम करतात, हे लपून राहिलेले नाही. त्या पक्षपाती अधिकारी असून विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि नि:पक्षपणे पार पडतील, याची खात्री नाही. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली होती.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना २०१९ मध्ये राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले होते, असा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात ६ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. २०१६-१७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त असताना शुक्ला यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन अमजद खान या ड्रग माफियाच्या नावे टॅप केला होता.
हा प्रकार उघड झाल्याने पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदावरून हटवलं होतं. आयोगाने त्यांची तात्काळ बदल करण्याचे आदेश दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.