सर्वसामान्यांना मोठा झटका; CNG च्या दरात पुन्हा वाढ, मध्यरात्रीपासून नवीन दर होणार लागू

pune cng rate : सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका बसला आहे. पुण्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.
CNG rate
pune cng rateSaam tv
Published On
Summary

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

पुण्यात सीएनजीचे दर पुन्हा वाढले

इंधन दरवाढीमुळे सर्वसामानांच्या खिशाला झळ

पश्चिम आशियात अमेरिका-इराणमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. या तणावजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. आज बुधवारी देखील सीएनजीच्या दरात वाढ झाली. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे २.५० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीचे पडसाद भारताच्या अर्थव्यवस्थेतवर उमटण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. पुण्यात आज पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात २.५० रुपयांनी वाढ झाली आहे.

CNG rate
CNG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा नवीन दर ७४.७५ रुपये प्रति किलो झाला आहे. जुने दर ९२.२५ रुपये प्रति किलो होते. प्रति किलोमागे २.५० रुपयांनी सीएनजीचे दर उद्यापासून वाढणार आहेत. नवीन दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

CNG rate
CNG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल किमतीत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज बुधवारी सीएनजीचा दर वाढला आहे. सीएनजीचा दर वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे .

देशातील विविध भागात सीएनजीचे दर वाढले आहेत. देशातील विविध शहरात सीएनजीचे वेगवेगळे दर आहेत. मुंबईत सीएनजीचा दर ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजी दर ९३.६५ रुपये प्रति किलो आहे. तर नवी मुंबईत सीएनजी ९६.९५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

CNG rate
सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीचा दर २ रुपयांनी वाढले, मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत वाढ

इंधनाच्या दरात वाढ होऊ लागल्याने जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढू लागल्या आहेत. हॉटेलच्या आहारात १५ टक्के ते २० टक्के इतकी वाढ झाली आहे. पावाच्या लादीत पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com