अभिजीत देशमुख, कल्याण
कोकणकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई गोवा माहमार्गाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर सिंधुदुर्गात आणि पुढे गोव्यात जाणाऱ्या ग्रीनफील्ड कॉरिडॉर या दुसऱ्या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण-डोंबिवलीला हजेरी लावली. या भेटीदरम्यान, आज रविवारी कॅन्सर रुग्णालयाचे भूमीपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी डोंबिवलीतील विविध विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पणही संपन्न झाले.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रविंद्र फाटक आदी नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या.
कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मंत्री रविंद्र चव्हाण हे देखील या रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर ठाणे जिल्ह्यात लवकरच कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
नव्या कर्करोग रुग्णालय हे ८ मजली असणार आहे. तसेच या रुग्णालयात १५० बेड्स असणार आहे. यापैकी १०० बेड्स कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी असणार आहे. तर ५० बेड्स प्रसुतीगृहासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयात प्रसूतीविषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत.
या कर्करोग रुग्णालयामुळे मुंबई, ठाण्याऐवजी आता महानगरपालिका क्षेत्राच उपचार मिळणे शक्य होणार आहे. या रुग्णालयात रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया आदी कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. भविष्यात होणाऱ्या याच रुग्णालयाचं भूमीपूजन ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक खासदार निवडून येतील. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.