Lok Sabha Election: भाजपच्या आणखी एका नेत्याचा निवडणूक लढवण्यास नकार, गुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी का घेतली माघार?

Nitin Patel: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अनेक नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अशातच आणखी एका नेत्याने माघार घेतली आहे.
Nitin Patel withdrew his claim from Mahesana Lok Sabha seat
Nitin Patel withdrew his claim from Mahesana Lok Sabha seatSaam Tv
Published On

Lok Sabha Election News:

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अनेक नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आसनसोलमधून तिकीट मिळाल्यानंतर भोजपुरी गायक पवन सिंह यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. अशातच आणखी एका नेत्याने माघार घेतली आहे. गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांनी रविवारी सांगितले की, त्यांनी मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा दावा मागे घेतला आहे.

भाजपचे दिग्गज नेते नितीन पटेल यांनी सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला. मात्र त्यांनी कोणतेही कारण सांगितले नाही. भाजपने अद्याप मेहसाणातून अधिकृतपणे उमेदवार जाहीर केलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nitin Patel withdrew his claim from Mahesana Lok Sabha seat
Pm Modi On Deepfak: 'हे डीपफेकचे युग आहे, आवाजही बदलता येतो' लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींनी मंत्र्यांना केलं सावध

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नितीन पटेल म्हणाले की, ''मी मेहसाणा जागेवर दावा केला होता. मेहसाणा लोकसभा जागेसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण त्याआधी मी भाजपचा उमेदवार म्हणून माझा दावा मागे घेतो आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन जगात भारताची प्रतिष्ठा वाढवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.''  (Latest Marathi News)

नितीन पटेल यांनी यापूर्वी कधीही लोकसभा निवडणूक लढवली नाही. विशेष म्हणजे भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात गुजरातमधील 15 उमेदवारांचा समावेश आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत.

Nitin Patel withdrew his claim from Mahesana Lok Sabha seat
Railway Crime News: जनरल तिकीट घेऊन एसी कोचमध्ये चढली महिला, संतापलेल्या टीटीईने केलं असं कृत्य, जाणून बसेल धक्का

दरम्यान, मेहसाणा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गृहजिल्हा आहे. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या पहिल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी हा एक आहे. यातच दोन अपवाद वगळता ही जागा तेव्हापासून भाजपच्या ताब्यात आहेत. नितीन पटेल यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि आनंदीबेन पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातही काम केले. त्यांनी 2016-17 आणि 2017 ते 2021 पर्यंत विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com