Pm Modi On Deepfak: 'हे डीपफेकचे युग आहे, आवाजही बदलता येतो' लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींनी मंत्र्यांना केलं सावध

Pm Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत PM मोदींनी मंत्र्यांना डीपफेकच्या मुद्द्यावर सावध राहण्यास सांगितले.
PM Narendra modi
PM Narendra modiSaam tv

Pm Modi On Deepfake:

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना डीपफेकच्या मुद्द्यावर सावध राहण्यास सांगितले. पंतप्रधानांनी मंत्र्यांना सल्ला दिला की, ''आजकाल डीपफेकचे युग आहे, ज्याद्वारे आवाज देखील बदलता येतो. सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.''

लोकसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसांनी जाहीर होऊ शकतात. यातच पंतप्रधान मोदींनी भाजपला 370 आणि एनडीएला 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बैठकीदरम्यान, 'विकसित भारत: 2047' साठी व्हिजन पेपर आणि पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावरही चर्चा करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra modi
Railway Crime News: जनरल तिकीट घेऊन एसी कोचमध्ये चढली महिला, संतापलेल्या टीटीईने केलं असं कृत्य, जाणून बसेल धक्का

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना निवडणुकीदरम्यान लोकांना भेटताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांना कोणताही वाद टाळण्यास आणि डीपफेकपासून सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे.

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की, "कोणतेही विधान करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आजकाल डीपफेकचा ट्रेंड आहे, ज्याद्वारे आवाज देखील बदलला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत काळजी घ्या.'' पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारच्या योजनांबद्दल लोकांना सांगा आणि वादग्रस्त वक्तव्ये टाळा.  (Latest Marathi News)

PM Narendra modi
Kalyan To Taloja: कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ; ठाणे, नवी मुंबईतील नागरिकांनाही होणार फायदा

सरकारी सूत्रांनी सांगितले की, बैठकीत मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच उचलल्या जाणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यसूचीच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. विकसित भारताचा रोडमॅप हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. सूत्रांनी सांगितले की, यात सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संघटना, नागरी समाज संघटना, वैज्ञानिक संस्था आणि तरुणांच्या सूचनांशी व्यापक सल्लामसलत करून सरकारच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com