Cm Eknath Shinde Helped Patient: रस्त्यात बंद पडली रुग्णवाहिका, मदतीला स्वतः मुख्यमंत्री आले धावून

रस्त्यात बंद पडली रुग्णवाहिका, मदतीला स्वतः मुख्यमंत्री आले धावून
Cm Eknath Shinde Helped Patient in Ambulance Stuck on Road
Cm Eknath Shinde Helped Patient in Ambulance Stuck on RoadSaam Tv
Published On

Cm Eknath Shinde Helped Patient: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली.

चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.

Cm Eknath Shinde Helped Patient in Ambulance Stuck on Road
Pune Crime News: पुण्यातील संतापजनक प्रकार! कामगाराकडून आश्रमातील ३ गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. (Latest Marathi News)

अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.

Cm Eknath Shinde Helped Patient in Ambulance Stuck on Road
Sharad Pawar News: "वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.." भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले...

मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहून सोनवणे यांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com