Shinde Government : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांनी केली घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
eknath shinde news
eknath shinde news saam tv

Eknath Shinde Government News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर मंगलप्रभात लोढा यांना मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

eknath shinde news
अनाथांच्या वाट्याचे खोके, घेऊन गेले बोके, यशोमती ठाकूरांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकार विराजमान होऊन चार महिने लोटले आहेत. मात्र, गेल्या महिन्यात पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार करण्यात येत होती.

स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयांवर ध्वजारोहण करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना नेमले होते, तर काही जिल्ह्यात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले होते. सरकार स्थापन होऊन चार महिन्यानंतरही पालमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यानंतर आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादीची घोषणा केली आहे.

eknath shinde news
Sanjay Pandey | माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 'सीबीआय'कडून अटक

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com