Eknath Shinde News: 'ठाकरेंना फक्त पैशांशीच घेणंदेणं', अपात्रता निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पहिलाच गंभीर आरोप

Eknath Shinde On Uddhav Thackeray: आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मागितली, पण त्यांनी स्वतचे नाव पुढे केलं. यावरून लक्षात आले, त्यांना काय हवे होते ते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde On Uddhav ThackeraySaam Tv
Published On

>> विनायक म्हात्रे

Eknath Shinde On Uddhav Thackeray:

'आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मागितली, पण त्यांनी स्वतचे नाव पुढे केलं. यावरून लक्षात आले, त्यांना काय हवे होते ते. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी मागण्याचे पाप देखील त्यांनी केले. त्यांना फक्त पैशांशीच घेणंदेणं', अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

निकाल जाहीर झल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, कालपासून जल्लोष सुरू आहे. एक आनंद झाला आहे, अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे काल या निर्णयाने दाखवून दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde On Uddhav Thackeray
CET Exam News: सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

ते म्हणाले, ''मेरिट प्रमाणे निकेल लागावा, लोकशाहीमध्ये बहुमताच्या महत्त्व असते. आमच्याकडे विधानसभेत आणि लोकसभेत बहुमत आहेत. भरत गोगावले हे मुख्य व्हीप, शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. समोरच्या लोकांनी खोटे कागदपत्र दिल्याचे निकालात म्हंटले आहे.'' (Latest Marathi News)

ठाकरे गटावर निशाणा साधत शिंदे म्हणाले, बहुमत असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केलेला, पण त्यांना यांनी मांडीवर घेतले, बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली.

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Delhi Earthquake: दिल्ली-NCR सह अख्खा उत्तर भारत भूकंपानं थरथरला; भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र दुसऱ्या देशात!

ते म्हणेल, अध्यक्षांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची असून भरत गोगावले हे व्हीप म्हणून मान्यता दिली. पण अपात्र केले नाही, यामागे काय कारण हे आम्हाला माहीत नाही, त्यांनी अपत्रतेचा निर्णय द्यायला हवा होता, समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने, कालचा निकाल जो दिलाय तो आम्ही देखील लीगल टीम सोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ.

ते म्हणेल, अध्यक्षांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची असून भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी अपत्रतेचा निर्णय द्यायला हवा होता, समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने, कालचा निकाल जो दिलाय तो आम्ही देखील लीगल टीमसोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com