रामनाथ दवणे आणि सूरज सावंत
मुंबई - अनिल देशमुख Anil Deshmukh याच्यावर जो बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या संदर्भात सीबीआयकडून CBI एक धक्कादायक माहिती समोर आली असून या माहितीत देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे सीबीआयच्या चौकशीतून समोर आले आहे. सीबीआयचा हाच अहवाल 'साम' च्या हाती लागला असून या अहवालात अनिल देशमुखांविरोधात सीबीआयच्या चौकशीत ठोस पुरावे मिळून आले नसल्याचे समोर आले आहे. नेमकं या अहवालात काय म्हटले आहेत ते पाहुयात...
1) मुंबईतल्या पोलीस उपायुक्त पदापर्यंतच्या बदल्या या पोलीस आयुक्तालयातून ठरवल्या जातात. IPS अधिकार्याच्या बदल्या आणि नियुक्त्या या पोलीस आस्थापना मंडळाकडून गृहसचिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जातात.
2) पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत निलंबित अधिकारी यांना पून्हा पोलीस खात्यात घेण्याचे अधिकार हे पोलीस आस्थापन मंडळाला असतात. तर ग्रामीण भागातील निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचे अधिकार हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक व गृहसचिव यांना असतात. मुंबई शहरामध्ये पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकार्याचे पूनस्थापनेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे पोलीस आयुक्तांना आहेत.
3) सचिन वाजे याला पून्हा सेवेत घेण्याबाबतचा निर्णय हा पोलीस आस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सचिन वाजेच्या पूनस्थापनेनंतर दोनच दिवसात त्याला सीआययू चा इनचार्ज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. ही पोस्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याची असताना. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पून्हा नियुक्ती झालेल्या सचिन वाजेला देण्यात आली. ही पोस्ट पोलीस खात्यातील महत्वाची पोस्ट असताना, एका सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकारी सचिन वाजे याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यावर तत्कालिन सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
हे देखील पहा -
4) सचिन वाजेची नियुक्ती केल्यानंतर तो प्रोटोकॉल पाळत नव्हता. तसेच तो त्यांच्या वरिष्ठांना डावलून थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करत होता. अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आले होतेकी, मुंबईतील अनेक मोठे आणि संवेदनशील गुन्हे हे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार सचिन वाजेला तपासासाठी देत होते. तसेच या संवेदनशील गुन्ह्यांची माहिती तत्कालिन पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जायचे. त्यावेळी ते सोबत सचिन वाजेलाही घेऊन जात होते. यावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता.
5) ज्या वेळी वाझे हे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि फेक टिआरपी केस मध्ये पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी जायचे, त्यावेळी वाझे आणि अनिल एकमेकांना ओळखत नव्हते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संबंधित तपास अधिकाऱ्याला बोलवले होते. त्यावेळी वाजे देशमुख यांच्या बंगल्यावर आला होता.
6) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यात ज्ञानेश्वरी या बंगल्यावर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी इतर अधिकाऱ्यांसोबत भेटायचे. या व्यतिरिक्त इतर कुठलिही बैठक झाली नाहीत.
7) सचिन वाजे यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबीर सिंहसोबत असताना. वर्षा बंगल्यावर फक्त दोनचं वेळा भेट झाली होती. पहिल्यांदा अर्णब गोस्वामी याला अटक केल्यानंतर तर ज्यावेळी अँटिलिया स्फोटक प्रकरण समोर आले म्हणजेच फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवडयात अशी माहिती समोर आली आहे.
8) अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनी वाजे यांच्याकडे आर्केस्ट्रा, बार, पब यांच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागितल्या बाबतचे पुरावे आढळूनआलेले नाहीत.
9) ACP संजय पाटील व DCP राजू भुजबळ यांनी देखील त्यांच्या जबाबात कुठल्याही प्रकारे कलेक्शन साठीचे आदेश हे देशमुख आणि पालांडे यांनी दिले नव्हते.
10 ) सचिन वाजे केव्हाही एकटे देशमुख यांना भेटलाच नाहीत.
11) सचिन वाजेज्या वेळी देशमुख यांना भेटायचे त्या वेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सोबत होते.
12) सह पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी वाजेची बदली सीआयू विभागात केली मात्र त्यांना पोलीस आयुक्त सिंह याचे आदेश होते.
13) सीबीआयकडे सचिन वाजेला वेळो वेळी सहकार्य करणे. आदेश देण्याबाबतचे बहुतांश पुरावे सीबीआयकडे आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.