नेहरू युवा केंद्राच्यावतीने फिट इंडिया रन स्पर्धाचे आयोजन

स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलढाणा याठिकाणी फिट इंडिया रनचे आयोजन
नेहरू युवा केंद्राच्यावतीने फिट इंडिया रन स्पर्धाचे आयोजन
नेहरू युवा केंद्राच्यावतीने फिट इंडिया रन स्पर्धाचे आयोजन संजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी Amrit Mahotsavi वर्षानिमित्त नेहरू युवा केंद्राच्यावतीने Nehru Youth Center घेण्यात आली. फिट इंडिया रन Fit India run स्पर्धा. स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलढाणा Buldhana याठिकाणी फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले होते. भारताला India स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

बुलढाणा याठिकाणी नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने फिट इंडिया रण आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी शहिदांना अभिवादन करण्यात आलं, बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून, आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित खेळाडूंना प्रतिज्ञा देण्यात आली.

हे देखील पहा-

या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते अप्पर जिल्हा पोलीस Police अधीक्षक बजरंग बनसोडे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर यावेळी उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथून फिट इंडिया रन स्पर्धेला आमदार गायकवाड यांनी हिरवी कंदील दाखवून उद्घाटन केले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा हुतात्मा स्मारक या ठिकाणी झाला आहे.

नेहरू युवा केंद्राच्यावतीने फिट इंडिया रन स्पर्धाचे आयोजन
समता परिषदेच्या वतीने मराठवाडा स्तरीय ओबीसी जनजागृती शिबिराचे आयोजन

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या, खेळाडूंनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा यावेळी दिल्या आहेत. फिट इंडिया रन स्पर्धेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 75 ठिकाणी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, याची सुरुवात आजपासून बुलढाणा येथून झाली अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली आहे. फिट इंडिया रन स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com