Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये फुल्ल राडा, दरवाज्यातच दोघे भिडले; प्रवासीही थरथरले, पाहा VIDEO

Local Train Fight Video: दोघांमध्ये अचानक बाचाबाची होते. वाद इतका विकोपाला जातो, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो.
Clash between two passengers in Mumbai local train viral video
Clash between two passengers in Mumbai local train viral videoSaam TV
Published On

Mumbai Local Train Fight Video

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी सोबत प्रवास करतात. त्यामुळे साहजिकच या गर्दीत कोणाची ना कोणाची बाचाबाची होत असते. कधीकधी प्रकरण हाणामारीपर्यंत देखील पोहचते. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून ट्रेनमधील भांडणाचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. (Latest Marathi News)

Clash between two passengers in Mumbai local train viral video
Pimpri Chinchwad: ड्रीम ११ वर टीम बनवून दीड कोटी जिंकले, पण... पिंपरी चिंचवडचे PSI अडचणीत का आले?

व्हायरल झालेल्या (Viral Video) व्हिडीओत दोन प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करताना दिसून येत आहे. यादरम्यान दोघांमध्ये अचानक बाचाबाची होते. वाद इतका विकोपाला जातो, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो.

हा संपूर्ण प्रकार पाहून इतर प्रवासी आरडाओरड करतात. अरे, वेडा आहेस का... आत या... असं म्हणत प्रवासी दोघांनाही दरवाज्यापासून बाजूला होण्याची विनंती करतात. यानंतर हे दोघेही प्रवासी आतमध्ये येतात आणि परत त्यांच्यात वाद सुरू होतो. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांना धडकली भरली आहे. काहींनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. एकाने कमेंट करताना लिहलंय, की लोकल ट्रेनमध्ये हे रोजचेच झाले आहे. दुसर्‍याने तर दुसऱ्याने छोट्याश्या गोष्टीवरून तुम्ही एकमेकांना माराल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबई Matters या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अशी प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. अलीकडेच, ट्रेनमध्ये दोन महिला एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Edited by - Satish Daud

Clash between two passengers in Mumbai local train viral video
Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com