सिडकोच्या घरांबाबत मोठी बातमी! जम्बो लॉटरी पुन्हा पुढे ढकलली, नागरिकांचा हिरमोड

CIDCO Jumbo Housing Lottery: सिडको जम्बो लॉटरी पुन्हा पुढे ढकलली. घरांच्या किमतींबाबत निर्णय प्रलंबित. मागील वर्षी २६ हजार घरे लॉटरीत होती, अनेकांनी परत केली.
CIDCO Jumbo Housing Lottery
CIDCO Jumbo Housing LotterySaam Tv News
Published On
Summary
  • सिडको जम्बो लॉटरी पुन्हा पुढे ढकलली

  • घरांच्या किमतींबाबत निर्णय प्रलंबित

  • मागील वर्षी २६ हजार घरे लॉटरीत होती, अनेकांनी परत केली

  • यंदा २२ हजार घरे लॉटरीत येणार होती, मात्र किंमत कपातीची हालचाल नाही

नवी मुंबईसह परिसरातील परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांचे हिरमोड करणारी बातमी समोर येत आहे. सिडकोच्या घरांच्या जम्बो लॉटरीची घोषणा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सिडकोकडून जम्बो लॉटरी काढली जाते. मात्र, यंदा अद्याप तरी लॉटरीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यादिनानिमित्त सिडकोकडून जम्बो लॉटरी काढली जाते. मात्र, यंदा लॉटरीची घोषणा करण्यात आलेली नाही. घरांच्या किमतींबाबत अजून निर्णय न झाल्याने सोडत प्रक्रियेतील धारक अडचणीत सापडले आहेत.

CIDCO Jumbo Housing Lottery
PM Narendra Modi: दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट; कराबाबत पीएम मोदींची मोठी घोषणा

यापूर्वी सिडकोकडून २६ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, घरे महाग असल्याने अनेकांनी ती सिडकोकडे परत केली होती. यंदा २२ हजार घरांची लॉटरी काढण्याची योजना होती. मात्र, किमती कमी करण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे.

CIDCO Jumbo Housing Lottery
BMC निवडणुकीसाठी जोरदार तयारी, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस म्हणाले..

एकीकडे सिडको घरांच्या किमती कमी करताना दिसून येत नाही आहे. दुसरीकडे सिडको लॉटरी काढत नाहीये. घरांच्या किमतींमध्ये घट न झाल्यास, पुन्हा एकदा मोठ्या संख्येने सोडत धारक सिडकोकडे आपली घरे परत करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईत ५ हजार घरांसाठी लॉटरी

मुंबईत दिवाळीपूर्वी म्हाडाकडून ५ हजार घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षभरात म्हाडाने मुंबईसह राज्यात १९,४९७ घरे बांधण्याची उद्दिष्ट ठेवले असून, मुंबईत ५,१९९ घरे बांधली जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी म्हाडाकडून ५ हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती आहे. यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com