फक्त आडनाववरून OBC डेटा गोळा करणं चुकीचं; मंत्री छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सध्या इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे.v

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv
Published On

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC reservation) राज्यात सध्या इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ओबीसी मागासवर्गीय आयोगाकडून फक्त आडनावांवरून हा डेटा गोळा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आक्षेप घेतला होता. आज महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहत नाराजी व्यक्त केली आहे. (OBC reservation Latest News In Maharastra)


Chhagan Bhujbal
विरोधकांनी माझ्यामागे सिल्लोडचा औरंगजेब लावला; रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान

मतदार याद्यांच्या माध्यमातून केवळ आडनावावरून माहिती गोळा करणे योग्य नसल्याचे मत छगन भुजबळ यांनी मांडलं आहे. ओबीसीचे नुकसान होऊ देऊ नका, अशी विनंती देखील त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्याची मागणी देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.

राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी मागासवर्गीय इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. पण केवळ आडनावांवरून हा डेटा गोळा केला जातोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल आक्षेप घेतला. इतकंच नाही तर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सुद्धा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं.


Chhagan Bhujbal
मोठी बातमी! अनिल परब ईडी चौकशीला गैरहजर?; हे कारण आलं समोर

'राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे, परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहीत धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी, यासाठी संबंधितांना सूचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी,, अशी मागणी पटोले यांनी केली होती.

दरम्यान, नाना पटोले यांच्यानंतर आता महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षणाच्या इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com